मुंबई

मजुराच्या मृत्यू प्रकरणी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी

भाईंदर पश्चिमेस एका बड्या बिल्डरच्या बांधकाम साईटवर ठेकेदारामार्फत मजुरी काम करणाऱ्या मजुराच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी ७ महिन्यांनी भाईंदर पोलिसांनी ठेकेदाराला विरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पश्चिमेस अग्निशमन केंद्रा जवळ शहरातील बडे बांधकाम व्यावसायिक असलेले दिलीप पोरवाल यांच्या लीना व्हेंचर्सचे २० मजली इमारतीचे काम सुरु आहे. इमारत बांधण्याचे कंत्राट मिळालेल्या दिनेश संघानी यांनी सेंट्रिंगचे काम महतो एन्टरप्राईझसचे जयराम महतो या ठेकेदारास दिले होते. दुसऱ्या मजल्याच्या स्लॅबचे कॉलमचे सेंट्रिंगचे काम करत असताना काम करणारा मजूर पशुपती ठाकूर (३०) हा २१ ऑक्टॉबर २०२१ रोजी खाली पडून गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान २७ ऑक्टोबर रोजी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ३ जून रोजी मयत पशुपतीचा लहान भाऊ आकाश याने दिलेल्या फिर्यादी नंतर ठेकेदार महतो याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भाईंदर पोलीस पुढील तपास करत असून गुन्हा दाखल करण्यास ७ महिने लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

कांदा दराचा प्रश्न पेटला; मुंबई-आग्रा महामार्गावर जोरदार निदर्शने; आज दिल्लीत बैठक

‘आंबा कॅनिंग’ला युद्धाचा फटका; दर कोसळले, परदेशातील मागणी घटली, बागायतदारांचे दुहेरी नुकसान

Mumbai : मेट्रो-६ प्रकल्पाचा खर्च ४४१ कोटींनी वाढला; RTI मधून धक्कादायक माहिती झाली उघड

Mumbai : रेल्वे स्टॉलवरचे खाणे महागणार; वडापाव, समोसा आता २० रुपये, १ जूनपासून दरवाढ लागू

सावंतवाडी स्थानकाला मधु दंडवते यांचे नाव; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय