मेहुल चोक्सी घोटाळा : पीएनबीच्या माजी मुख्याधिकाऱ्यांवर आरोपपत्र 
मुंबई

मेहुल चोक्सी घोटाळा : पीएनबीच्या माजी मुख्याधिकाऱ्यांवर आरोपपत्र

मेहुल चोक्सीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल आठ वर्षांनी ‘सीबीआय’ने ‘पंजाब नॅशनल बँके’च्या (पीएनबी) तत्कालीन मुख्य अंतर्गत लेखापरीक्षकासह चोक्सीच्या कंपनीतील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.

Swapnil S

चारूल जोशी/मुंबई

मेहुल चोक्सीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल आठ वर्षांनी ‘सीबीआय’ने ‘पंजाब नॅशनल बँके’च्या (पीएनबी) तत्कालीन मुख्य अंतर्गत लेखापरीक्षकासह चोक्सीच्या कंपनीतील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.

विशेष सीबीआय न्यायाधीश एस. के. कऱ्हाळे यांनी या आरोपपत्राची दखल घेतली आहे. ‘पीएनबी’च्या बीकेसी ब्रॅडी हाऊस शाखेचे तत्कालीन मुख्य अंतर्गत लेखापरीक्षक विष्णूब्रत मिश्रा, ‘फोर सीज् डायमंड डिस्ट्रीब्युटर्स हाँगकाँग’चे भागीदार जयेश शाह, ‘गीतांजली जेम्स’चे आयात-निर्यात व्यवस्थापक अजित भेडा आणि ‘गीतांजली जेम्स’चे वरिष्ठ उपाध्यक्ष दीपेन शहा अशी आरोपपत्र दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपींनी गुन्हेगारी कट रचून ‘पीएनबी’ची मंजुरी मर्यादा नसताना ‘मेसर्स गिली

इंडिया लि.’ व ‘मेसर्स गीतांजली एक्स्पोर्ट्स कॉर्पोरेशन लि.’च्या नावाने ११८ बनावट ‘एलओयू’ मिळवले. तसेच २०१६ मध्ये कोणतीही मंजुरी मर्यादा आणि ११० टक्के रोख रक्कम जमा नसताना

बँकेच्या ‘सीबीएस’ प्रणालीत नोंद न करता ‘मेसर्स अस्मी ज्वेलरी इंडिया लि.’, ‘मेसर्स गिली इंडिया लि.’, ‘मेसर्स

गीतांजली एक्स्पोर्ट्स कॉर्पोरेशन लि.’ व ‘मेसर्स नक्षत्र ब्रँड्स लि.’ साठी ११६ बनावट ‘एलओयू’ जारी केले, असा आरोप सीबीआयने केला आहे.

आरोपींनी कट रचून बनावट एलओयू जारी करण्यास मदत केली आणि बँकेच्या निधीचा गैरवापर केला, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपींना नोटीस जारी केली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

वंदे मातरमचा अपमान आता फौजदारी गुन्हा; विधेयक राज्यसभेत मंजूर

जन्ममृत्यू नोंदींबाबत नवे सुधारणा ‌विधेयक

मुंबईत पावसाचा जोर वाढणार! ठाणे, रायगड, पालघरमध्ये कोसळधारेचा इशारा; पुण्यात जुलैतील विक्रम मोडणार

दिल्लीत मुसळधार पावसाचा कहर; मेट्रो स्थानकांमध्ये शिरलं पाणी, रस्तेही जलमय

शाळांजवळ ५० मीटरच्या परिसरात 'जंक फूड' विक्री बंद; कठोर कारवाईचा FDA चा इशारा