मुंबई

CBI on Disha Salian case: एकेकाळी महाराष्ट्राचे राजकारण तापवणाऱ्या दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयचा खुलासा

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या (CBI on Disha Salian case) मृत्यू प्रकरणात सीबीआयने अहवाल सादर केला असून त्यामध्ये मोठा खुलासा करण्यात आला आहे.

प्रतिनिधी

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याची माजी मॅनेजर दिशा सालियनचा (Disha Salian) मालाड येथे मृत्यू झाला होता. (CBI on Disha Salian case) याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र काही राजकीय नेत्यांनी केलेल्या आरोपांनंतर हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले होते. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) तपासानंतर दिशाचा मृत्यू अपघाती असल्याचा निष्कर्ष काढला आहे. सीबीआयने सादर केलेल्या अहवालात दिशाचा मृत्यू अपघातीच होता, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सीबीआयने दिलेल्या अहवालात दिशा सालियनचा दारूच्या नशेत तोल गेला आणि १४व्या मजल्यावरून पडून डोक्याला गंभीर इजा झाल्याने मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केली त्याच्या ५ दिवस अगोदर ही घटना घडली होती. या सगळ्या प्रकरणांचा एकमेकांशी संबंध असल्याचा दावा भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला होता. दिशा सालियानवर अत्याचार झाला आणि त्यानंतर तिचा खून झाला. हे सगळं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालं. या गुन्ह्यामध्ये उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरेंचाही समावेश असल्याचा दावा राणेंनी केला होता. परंतु, आता सीबीआयच्या या अहवालामुळे दिशाची आत्महत्या झाल्याचा, बलात्कार झाल्याचा आणि खून झाल्याचे सर्व आरोप खोटे ठरले आहेत.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक