मुंबई : देशव्यापी मेगा एमएसएमई क्रेडिट आऊटरीच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून मुंबई मेट्रो झोनल ऑफिस (एमएमझेडओ) च्या मार्गदर्शनाखाली दादर/माटुंगा येथे मेगा एमएसएमई क्रेडिट आऊटरीच कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक मुरली कृष्ण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी झोनल हेड डी. एस. राठोर, रिजनल हेड प्रणव कपूर, रिजनल हेड नवीन ग्रोवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला उद्योजक, एमएसएमई ग्राहक तसेच व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुरली कृष्ण यांनी एमएसएमई क्षेत्राच्या विकासासाठी बँकेच्या सातत्यपूर्ण व दृढ बांधिलकीवर प्रकाश टाकला तसेच वेळेवर, सुलभ आणि ग्राहककेंद्रित कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बँकेमार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. उद्योजकांनी आपल्या व्यवसायाच्या वाढीला चालना देण्यासाठी बँकेच्या विविध एमएसएमई उत्पादनांचा तसेच व्यापक वित्तीय उपाययोजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
१८३ कोटींच्या कर्जाना मंजुरी
मेगा एमएसएमई क्रेडिट आऊटरीच कॅम्पदरम्यान बँकेला सुमारे ५७७कोटींच्या व्यावसायिक क्षमतेचे कर्ज प्रस्ताव/लीड प्राप्त झाले. जलद आणि वेळेवर कर्ज वितरण करण्याच्या बँकेच्या बांधिलकीचे दर्शन घडवत प्राप्त झालेल्या एकूण लीडपैकी १८३ कोटींच्या कर्जाना या कॅम्पदरम्यान मंजुरी देण्यात आली.