ANI
मुंबई

रविवारी मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवार १४ मे रोजी रेल्वेच्या मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

नवशक्ती Web Desk

उपनगरीय रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवार १४ मे रोजी रेल्वेच्या मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते ठाणे अप आणि डाउन धिम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील पनवेल - वाशी अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर शनिवारच्या मध्यरात्री वसई रोड ते भाईंदर अप- डाऊन जलद मार्गावर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे

कुठे : माटुंगा-ठाणे अप आणि डाउन धिम्या मार्गावर

कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत

परिणाम : या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप मुलुंड आणि ठाणे या स्थानकांवर थांबून पुन्हा डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशीराने पोहोचेल. तर कल्याण येथून अप-धिम्या मार्गावरील सेवा ठाणे आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर रेल्वे

कुठे : पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर

कधी : सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत पनवेल/बेलापूर येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून ठाणे करीता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून ठाणेकरीता सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा रद्द राहतील. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.

पश्चिम रेल्वे

कुठे : वसई रोड ते भाईंदर अप- डाऊन जलद मार्गावर

कधी : शनिवारी रात्री ११.३० ते रविवारी पहाटे ४.४५ वाजेपर्यत

परिणाम : या ब्लॉकदरम्यान अप-डाउन जलद मार्गावरील लोकल सेवा भाईंदर ते बोरिवली स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. तर बोरिवलीहून सुटणाऱ्या काही लोकल गाड्या ब्लॉक दरम्यान रद्द असणार आहे. तर रविवार १४ मे रोजी कोणताही दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार नसल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे.

पेढा, पनीरसह मिठाईही महागणार; दक्षिण मुंबईत म्हशीचे दूध ११२ रु. लिटर

देशभरात साखरेचे दर चढेच; किरकोळ बाजारात भाव ₹६० च्या पार, केंद्र सरकारने अनेक पावले उचलूनही साखर कडूच

मुंबई पोलिसांच्या घोडदळ पथकासाठी १.२७ कोटींचा निधी मंजूर; ३८ पोलिसांचे पथक तैनात, मुंबई पोलिसांचे बळ वाढणार

Mumbai : वाकोला नदीजवळच संरक्षक जाळ्या बसवणार; पालिका पावणेदोन कोटी खर्च करणार

Mumbai : नारळाच्या झाडांना संरक्षण जाळ्या बसवा! पालिका आयुक्त, उद्यान अधीक्षकांना मकरंद नार्वेकर यांचे पत्र