प्रातिनिधिक छायाचित्र X - @ivivekch
मुंबई

चित्रीकरणातून मध्य रेल्वेला ४०.१३ लाखांचे उत्पन्न; आपटा आणि सीएसएमटीला निर्मात्यांची पसंती

मुंबई : चित्रपट, वेब सिरीजच्या चित्रीकरणासाठी निर्मात्यांनी मध्य रेल्वेच्या आपटा आणि सीएसएमटी स्थानकांना पसंती दिली आहे. चित्रिकरणाच्या माध्यमातून मध्य रेल्वेला २०२४-२५ या आर्थिक वर्षात ४०.१३ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे.

Kkhushi Niramish

मुंबई : चित्रपट, वेब सिरीजच्या चित्रीकरणासाठी निर्मात्यांनी मध्य रेल्वेच्या आपटा आणि सीएसएमटी स्थानकांना पसंती दिली आहे. चित्रिकरणाच्या माध्यमातून मध्य रेल्वेला २०२४-२५ या आर्थिक वर्षात ४०.१३ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. मध्य रेल्वेच्या विविध ठिकाणी विविध चित्रपट निर्माते आणि धर्मा प्रॉडक्शन्स सारख्या आघाडीच्या निर्मिती संस्थांनी ३ नेटफ्लिक्स चित्रपट, २ वेब सिरीज, १ प्रादेशिक चित्रपट आणि १ जाहिरात चित्रपट असे सुमारे ७ चित्रीकरण केले.

मध्य रेल्वेने, कथा पिक्चर्स प्रोडक्शनच्या "गांधारी" चित्रपटाच्या चित्रीकरणातून सर्वाधिक १७.८५ लाख रुपये मिळविले, त्यानंतर धर्मा प्रोडक्शनच्या "आप जैसा कोई" चित्रपटाच्या चित्रीकरणातून ८.१२ लाख रुपये मिळविले.

हे दोन्ही चित्रपट आपटा स्टेशनवर चित्रित झाले आहेत. ते पूर्वी दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, मुन्ना मायकल आणि इतर सारख्या प्रतिष्ठित चित्रपटांसाठीचे ठिकाण होते. नैसर्गिक सौंदर्यामुळे आपटा स्टेशन, मध्य रेल्वेवरील सर्वात आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात आपटा येथे एकूण ३ चित्रीकरणे झाली आहेत.

२०२४-२५ दरम्यान चित्रित झालेले चित्रपट

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे नेटफ्लिक्स चित्रपट खाकी आणि टी-२० विश्वचषक जाहिरात

  • कॉटन ग्रीन स्टेशनवर तेलगू चित्रपट कुबेर

  • आपटा येथे चिल्ड्रन ऑफ फ्रीडम वेब सिरीज

  • माटुंगा येथे दल दल वेब सिरीज

यापूर्वी चित्रीकरण झालेले चित्रपट

मध्य रेल्वेवर स्लमडॉग मिलेनियर, कमिने, रब ने बना दी जोडी, रा-वन, रावन, प्रेम रतन धन पायो, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कुछ कुछ होता है, दबंग, दरबार, रंग दे बसंती, पेहंकी, बांहग, यांसारखे अनेक बॉक्स ऑफिस हिट चित्रपट शूट झाले आहेत. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सर्वात पसंतीची ठिकाणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आपटा, पनवेल, लोणावळा, खंडाळा, वाठार, सातारा सारखी इतर लोकप्रिय स्थानके आणि तुर्भे आणि वाडी बंदर सारखी रेल्वे यार्ड आहेत.

परवानगीसाठी सिंगल विंडो सिस्टम

मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून चित्रपटाच्या चित्रीकरणाची परवानगी दिली जाते आणि चित्रपटाच्या चित्रीकरणाची परवानगी जलद मिळावी यासाठी एक 'सिंगल विंडो सिस्टम' सुरू करण्यात आली आहे. प्रक्रियेच्या या सरलीकरणामुळे चित्रपट कंपन्यांना अर्जासोबत पटकथा आणि आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर परवानगी मिळण्यास मदत होते.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली