Mumbai : मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक; कुर्ला ते वाशी मार्गावर ब्लॉक संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक; कुर्ला ते वाशी मार्गावर ब्लॉक

मध्य रेल्वेच्या विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार, २३ ऑगस्ट रोजी उपनगरीय मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : मध्य रेल्वेच्या विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार, २३ ऑगस्ट रोजी उपनगरीय मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गांवर ब्लॉक घेतला आहे. तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यानच्या अप-डाऊन मार्गावर आहे.

सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असेल. सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ या वेळेत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील.

हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. सीएसएमटी येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ दरम्यान सुटणाऱ्या वाशी,बेलापूर,पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल, बेलापूर,वाशी येथून सकाळी १०.१७ ते दुपारी ३.४७ दरम्यान सुटणाऱ्या सीएसएमटी येथे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

तुम्हालाही थोडा त्रास होऊ द्या! ॲनालॉग पनीर वापरल्यामुळे परवाना रद्द झालेल्या हॉटेलला मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले

Mumbai : मालमत्तेतील हक्क तोंडी सोडणे कायदेशीर वैध; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

आत्महत्येची धमकी देणाऱ्या मुलासह आई-वडिलांचा मृत्यू; उंच कड्यावरून तिघेही कोसळले, संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

Mumbai : दिव्यांगाला लोकलमधून ढकलणाऱ्या आरोपीला कोठडी

Mumbai : विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द; नगरसेवक पद धोक्यात