मध्य रेल्वेवर दररोज ११ हजारांहून अधिक विनातिकीट प्रवासी (Photo- Vijay Gohil/FPJ)
मुंबई

मध्य रेल्वेवर दररोज ११ हजारांहून अधिक विनातिकीट प्रवासी

विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने कारवाई तीव्र केली आहे.

Swapnil S

मुंबई : विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने कारवाई तीव्र केली आहे. किमान दंडाच्या रकमेत झालेली वाढ, तिकीट तपासणीच्या मोहिमांमुळे २०२६-२७ मध्ये प्रशासनाला दंडात्मक महसूल प्राप्त झाला आहे. यातून मध्य रेल्वेवर दररोज ११ हजाराहून अधिक प्रवासी विनातिकीट प्रवास करत असल्याचे समोर आले आहे.

मध्य रेल्वेने एप्रिल ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत कारवाई केली. एप्रिल ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत तिकीट तपासणी पथकांनी विनातिकीट किंवा अयोग्य/अवैध प्रवास करणाऱ्या १८ लाख ३ हजार प्रवाशांना पकडले. त्यांच्याकडून १४० कोटी ८१ लाख रुपयांचा दंड वसूल केला. गेल्या वर्षी तुलनेत या वर्षीच्या प्रकरणांच्या संख्येत ५ टक्के, उत्पन्नात ४० टक्के वाढ झाली आहे.

एप्रिल ते ऑगस्ट २०२६ या कालावधीतील विभागनिहाय कामगिरीमध्ये मुंबई विभागात ८ लाख ८० हजार प्रकरणांतून ५८ कोटी ४६ लाख रुपये, भुसावळ विभाग ३ लाख ४२ लाख प्रकरणांतून ३५ कोटी ५२ लाख रुपये, पुणे विभागात १ लाख ८६ हजार प्रकरणांतून १६ कोटी २९ लाख रुपये, नागपूर विभागमध्ये २ लाख ११ हजार प्रकरणांतून १५ कोटी ८३ लाख रुपये सोलापूर विभागात ९५ लाख प्रकरणांतून ६ कोटी १३ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IIT Bombay मध्ये छतावरील पंख्यांऐवजी भिंतीवरचे पंखे

Jalgoan : विद्यार्थ्यांच्या मनात पेटणार ‘ज्योती’; २८ जिल्ह्यांतील १ हजार ८०० शाळांमध्ये लघुपट दाखवणार

छत्रपती संभाजीनगर : मुकुटबन-गडचांदूर रेल्वेमार्गासाठी ४९३ कोटींची मंजुरी

माझी प्रकृती उत्तम - सलमान खानचा खुलासा

हरित लवादाचे मोदी सरकारकडून खच्चीकरण; काँग्रेसचा आरोप, उद्योगांच्या बाजूने निकाल होत असल्याची तक्रार