मुंबई

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; चिंचपोकळी आणि करी रोडला लोकल थांबणार नाही

रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायरची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी रविवारी मध्य रेल्वेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे चिंचपोकळी आणि करी रोड रेल्वे स्थानकांवर गाडी थांबणार नसल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत.

Swapnil S

मुंबई : रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायरची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी रविवारी मध्य रेल्वेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे चिंचपोकळी आणि करी रोड रेल्वे स्थानकांवर गाडी थांबणार नसल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत सीएसएमटीवरून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत.

या लोकल सेवा भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकावर डाऊन - धीम्या मार्गावर वळवल्या जातील. घाटकोपरवरून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप - धीम्या लोकल सेवा विद्याविहार ते - सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप - जलद मार्गावर वळवल्या जातील.

हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल. सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत सीएसएमटीवरून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत वाशी / बेलापूर/पनवेलला जाणाऱ्या डाऊन लोकल सेवा आणि पनवेल / बेलापूर/वाशीहून सकाळी १०.१७ ते दुपारी ३.४७ पर्यंत सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप लोकल सेवा रद्द राहतील.

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर मुंबई सेंट्रल स्थानकातील सर्व मार्गावर शनिवारी रात्री १२.३० ते रविवारी पहाटे ४ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. यामुळे पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसभर ब्लॉक नसेल.

Video : नेपाळमध्ये महाप्रलय! भोटे कोशी नदीला अचानक महापूर; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती, किमान १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता

शासकीय, खासगी, धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिट; तातडीने कार्यवाही करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे निर्देश, राज्य सरकार ॲक्शन मोडवर

Pune : भटक्या कुत्र्याचा महिलेवर हल्ला; तोल जाताच बाळ पडलं खाली, Video व्हायरल

Mumbai : निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता; राजावाडी रुग्णालयातील अन्य डॉक्टरांवर ताण, दिवसाला ५०० रुग्णांची तपासणी

Madhya Pradesh : भाजप आमदाराने अग्निशमन दलाच्या वाहनाने धुतली स्वतःची कार; VIDEO व्हायरल