मुंबई : मध्य रेल्वेने ठाणे आणि कल्याण दरम्यानच्या उपनगरीय मार्गावरील ५व्या व ६व्या मार्गावर ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान ५व्या व ६व्या मार्गावर सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे.
वसई रोड स्थानकावरून सकाळी ०९.५० वाजता सुटणारी गाडी क्रमांक ६१००३ वसई रोड - दिवा मेमू कोपर स्थानक येथेच शॉर्ट टर्मिनेट होईल. दिवा स्थानकावरून सकाळी ११.३० वाजता सुटणारी गाडी क्रमांक ६१००४ दिवा-वसई रोड मेमू कोपर स्थानक येथून सकाळी ११.४५ वाजता शॉर्ट ओरिजिनेट होईल. मेन, हार्बर, ट्रान्स-हार्बर आणि पोर्ट लाईन्सवर कोणताही ‘मेगा ब्लॉक’ नाही.
पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक
पश्चिम रेल्वेवर शनिवार-रविवारच्या मध्यरात्री, सांताक्रूझ-माहीम स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे. अप जलद मार्गावर मध्यरात्री १२ ते पहाटे ४ तर, डाऊन जलद मार्गावर मध्यरात्री १२.३० ते पहाटे ४.३० या वेळेत ब्लॉक राहील. या कालावधीत अंधेरी-चर्चगेटदरम्यानच्या जलद लोकल धीम्या मार्गावरून चालवल्या जातील.