मुंबई

Mumbai: मध्य रेल्वेची फुकट्या प्रवाशांवर कारवाई, तब्बल 'इतक्या' कोटींची वसुली

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मेल–एक्स्प्रेस गाड्या, वातानुकूलित व गैर-वातानुकूलित उपनगरी गाड्या तसेच स्थानक परिसरातही अनियमित प्रवास रोखण्यासाठी आणि अधिकृत प्रवाशांच्या सुरक्षितते व सोयीसाठी नियमित विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवली जाते.

Swapnil S

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील तिकीट तपासणी पथकाने मेल–एक्स्प्रेस व उपनगरी गाड्यांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ४०.५९ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मेल–एक्स्प्रेस गाड्या, वातानुकूलित व गैर-वातानुकूलित उपनगरी गाड्या तसेच स्थानक परिसरातही अनियमित प्रवास रोखण्यासाठी आणि अधिकृत प्रवाशांच्या सुरक्षितते व सोयीसाठी नियमित विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवली जाते.

या विशेष मोहिमेत आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत ९ लाख ६३ हजार विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये या प्रवाशांकडून ४०.५९ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.

वातानुकूलित उपनगरी गाड्यांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या ७१ हजार ०४५ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये २.२८ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर प्रथम श्रेणी डब्यांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या ९१ हजार ८३७ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २.९३ कोटी रुपये दंड घेण्यात आला, तर द्वितीय श्रेणी डब्यांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या ६ लाख ९८ हजार २४८ प्रकरणे समोर आली. यामध्ये ३३.६९ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. मेल व एक्स्प्रेस गाड्यांमध्ये भाडेफरकाची १३,३०१ प्रकरणे समोर आली. त्यांच्याकडून ०.७१ कोटी रुपये दंड घेण्यात आला, तर बुकिंग न केलेल्या सामानामधून ८८ हजार ७१३ प्रकरणे समोर आली. त्यांच्याकडून ०.९८ कोटी रुपये दंड घेण्यात आला.

Mumbai : रक्षाबंधनानिमित्त BEST च्या १३६ अतिरिक्त बसेस

Mira Bhayandar : महापालिकेच्या निमंत्रण पत्रिकेतून मराठी गायब; नावांच्या चुकीने परिवहन सभापती अडचणीत

Mumbai : रेल्वे कॅटरिंग कर्मचाऱ्यांसाठी गणवेश अनिवार्य; मुंबई विभागातील रेल्वे स्टॉल्ससाठी सुधारित नियमावली लागू; पश्चिम रेल्वेचा निर्णय

गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाला वेग! 'तुळशी'ने ९ मीटर बोगदा खणला

Mumbai : सात दिवसांत कोट्यवधी रुपयांची थकीत रक्कम भरा; अन्यथा जप्त मालमत्तांचा लिलाव- पालिकेचा इशारा