मुंबई

मध्य, हार्बर रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर मात्र नो ब्लॉक

मध्य रेल्वेच्या मुलुंड-माटुंगा अप जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : रुळांची दुरुस्ती ओव्हरहेड वायर दुरुस्ती सिंगल यंत्रणेची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी रविवार, २१ जानेवारी रोजी मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे मेगाब्लॉक कालावधीत काही लोकल उशिराने धावणार असून काही लोकल रद्द करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारचा मेगा ब्लॉक रद्द करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.

मध्य रेल्वेच्या मुलुंड-माटुंगा अप जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत ठाणे स्थानकातून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहेत. या कालावधीत सीएसएमटी स्थानकातून वाशी, बेलापूर, पनवेलसाठी सुटणाऱ्या आणि पनवेल, बेलापूर, वाशी स्थानकातून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील, तर हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत ठाणे, वाशी, नेरूळ स्थानकावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

विधान परिषद निवडणुकीचे नाट्य संपुष्टात; सर्व दहा जण बिनविरोध; पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचा एकमेव अर्ज

परवानग्यांचे 'बोन्साय'; एकीकडे ३०० कोटी झाडे लावणार, दुसरीकडे वृक्षतोड झाली सोपी

सुप्रिया सुळे यांनी केली तलवार म्यान; 'आता पवारांशी लढणार नाही'

लवकरच वादळ येणार, ट्रम्प यांची नवी धमकी

Maharashtra Din 2026 : "प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा"; महाराष्ट्र दिनानिमित्त प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा