चेंबूर झाड दुर्घटना, कारण अस्पष्टच! कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाईची समितीची शिफारस  (Photo-X)
मुंबई

चेंबूर झाड दुर्घटना, कारण अस्पष्टच! कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाईची समितीची शिफारस

चेंबूर येथील दुर्घटनेतील चौकशी अहवाल समोर आला असून उद्यान विभाग आणि रस्ते विभागाला क्लिनचिट दिली आहे.

Swapnil S

मुंबई : चेंबूर येथील दुर्घटनेतील चौकशी अहवाल समोर आला असून उद्यान विभाग आणि रस्ते विभागाला क्लिनचिट दिली आहे. मात्र झाडाजवळ सुरू असलेल्या कामादरम्यान योग्य ती खबरदारी न घेतल्याचा ठपका ठेवत रस्ते विभागाचा कंत्राटदार मे. गवार कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांच्यावर ५ लाख रुपये, तर कामावर देखरेख ठेवणारे मे. माहिमतुरा कन्सल्टंट यांच्यावर २ लाख रुपये दंडाची शिफारस चौकशी समितीने केली आहे.

दरम्यान, रस्त्यांच्या काँक्रीटीकरणावेळी झाडांच्या बुंध्याभोवती ३ मीटर बाय ३ मीटरचा पाण्याचा व हवेचा प्रवेश राहील असा मोकळा भाग ठेवणे, अशा महत्त्वाच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत. मात्र चेंबूर येथे झाड कोसळण्याचे कारण अस्पष्टच आहे.

चेंबूर दुर्घटनेतील अहवाल महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे सादर करण्यात आला असून, त्यातील निष्कर्ष व शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. चौकशी समितीच्या निष्कर्षानुसार, दुर्घटनेपूर्वी उद्यान विभागाने संबंधित झाडाची आवश्यक छाटणी केली होती तसेच पर्जन्य जलवाहिनीच्या कामामुळे झाडाच्या सुरक्षिततेबाबत रस्ते विभागाला वेळोवेळी सूचना दिल्या होत्या.

या उपाययोजनांवर भर

झाडांच्या सुरक्षिततेसाठी प्रमाणित मानक कार्यप्रणाली तयार करणे, प्रत्येक प्रकल्पासाठी वृक्षतज्ज्ञांची नियुक्ती करणे, झाडांचे नियमित ट्री रिस्क असेसमेंट, जीआयएस आधारित नोंदणी, झाडांच्या मुळांचे वैज्ञानिक संरक्षण, अतिरिक्त काँक्रीटीकरण टाळणे, अशी सूचना समितीने केली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Nepal Earthquake : नेपाळमध्ये भूकंप; भारतासह 'या' देशांनाही धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

हेपेटायटिस-बीचा वाढता धोका! रुग्णसंख्येत चार वर्षांत जवळपास दुपटीने वाढ; नव्या रुग्णांत ९६ टक्के वाढ

ताजमहालची सहल आटोपून परतणाऱ्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला! उभ्या स्कूल बसला ट्रकची धडक; ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू, ३२ जखमी

Mumbai : भाडेतत्त्वावरील बसगाड्यांचे होणार परफॉर्मन्स ऑडिट! आर्थिक तोटा व सुरक्षेच्या प्रश्नांमुळे कंत्राटांचा फेरआढावा

'हापूस'वर गुजरातचा डोळा; नावावर वलसाडची दावेदारी, बाजारपेठ काबीज करण्याचा डाव