मुंबई

सात दिवसांत मुंबई चकाचक करा मुख्यमंत्र्यांचे आयुक्तांना आदेश

पालिकेच्या स्वच्छता विभागाने गांभीर्याने घ्यावे, असे सक्त निर्देश त्यांनी दिले आहेत

नवशक्ती Web Desk

मुंबई : माझगाव डॉक परिसरात अस्वच्छता, कचऱ्याचे ढीग निदर्शनास येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील सात दिवसांत मुंबई चकाचक करा, असे आदेश मुख्यमंत्री शिंदेंनी पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांना दिले आहेत. स्वच्छतेत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी चहल यांना दिले आहेत. माझगाव डॉक येथील कार्यक्रमातून परतत असताना शिंदे यांना या परिसरात काही ठिकाणी राडारोडा, अस्वच्छता, कचरा आढळला होता.

‘मुंबईतील केवळ प्रमुख रस्ते नव्हे, तर अगदी गल्लीबोळातून त्वरीत स्वच्छता मोहीम राबवावी, असे आदेश शिंदे यांनी शुक्रवारी आयुक्त डॉ. चहल यांना दिले. मुंबईतील स्वच्छतेबाबत कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही, याची नोंद पालिकेच्या स्वच्छता विभागाने गांभीर्याने घ्यावे, असे सक्त निर्देश त्यांनी दिले आहेत.

माझगाव डॉक येथील कार्यक्रमाहून परतत असतांना मुख्यमंत्री शिंदे यांना या परिसरात काही ठिकाणी राडारोडा, अस्वच्छता - कचरा आढळला. त्याची दखल घेत, तेथूनच शिंदे यांनी आयुक्त डॉ. चहल यांना दुरध्वनीद्वारे संपर्क करत या परिसरातील नव्हे, तर मुंबईतील सर्व रस्ते, गल्ली बोळ, छोटे रस्ते स्वच्छ करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. ‘मुंबईत कुठेही रस्त्यावर कचरा दिसता कामा नये. याची काळजी घ्या. राडारोडा आणि कचरा त्वरीत हटवा. यासाठी पालिकेचे सर्व सहाय्यक आयुक्त, वॉर्ड ऑफिसर, स्वच्छता निरीक्षक- स्वच्छता कर्मचारी अशा सर्व यंत्रणांना कामाला लावा. शहरातील ज्या-ज्या ठिकाणी भिंतींचे सुशोभीकरण करण्याचे काम अपूर्ण आहे, ते त्वरीत पूर्ण करा,’ अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

स्वच्छतेत हलगर्जीपणा तर कारवाईचा बडगा

माझगाव डॉक परिसरातील अस्वच्छता प्रकरणी तेथील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. तसेच येत्या सात दिवसांमध्ये मुंबईतील सर्व वॉर्ड आणि त्यांचा परिसर, सर्व समुद्रकिनारे यांची स्वच्छता युद्ध पातळीवर हाती घेण्यात येईल, असेही डॉ. चहल यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

NCERT च्या नव्या पाठ्यपुस्तकातील 'डान्सिंग गर्ल'वरून वाद; मोहेंजोदडोची मूळ प्रतिमा बदलल्याची चर्चा

२२ व्या वर्षी जगाचा निरोप; अभिनेत्री संचिता उगलेने राहत्या घरीच संपवलं जीवन, पोलीस तपास सुरू

अन्नभेसळ करणाऱ्यांना FDA चा दणका; वसई-विरारमध्ये १८ दुकाने सील, लाखोंचा भेसळयुक्त माल जप्त

रीलमध्ये हसत-नाचत होती, पण... अभिनेत्री संचिता उगलेने उचललं टोकाचं पाऊल; शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत

गळ्यात साखळदंड, अंगावर चटके; पतीच्या जाचातून सुटण्यासाठी महिलेची ६ किमी पायपीट, थेट पोलीस ठाणं गाठलं