Mumbai : चिंतामणीच्या आगमन सोहळ्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त; लालबागला छावणीचे स्वरूप 
मुंबई

Mumbai : चिंतामणीच्या आगमन सोहळ्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त; लालबागला छावणीचे स्वरूप

चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या भव्य आगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सुरक्षेची चोख व्यवस्था केली असून, लालबाग-चिंचपोकळी परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

प्रतिनिधी

पूनम अपराज/मुंबई

चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या भव्य आगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सुरक्षेची चोख व्यवस्था केली असून, लालबाग-चिंचपोकळी परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

मुंबईतील अनेक प्रमुख गणपती मंडळांच्या मूर्तींचे शनिवारी आगमन होणार आहे. यामध्ये चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या भव्य आगमन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून शुक्रवारी रात्रीपासूनच चिंचपोकळी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून शुक्रवारी काळाचौकी सिग्नलजवळ मोठ्या संख्येने पोलीस ताफा आणि वाहने तैनात करण्यात आली आहेत. या आगमन सोहळ्यादरम्यान परिसरात सुमारे ८०० ते १,००० पोलीस कर्मचाऱ्यांचा खडा पहारा असणार आहे.

विशेष दक्षता आणि सुरक्षा व्यवस्था

परळ परिसरात नुकत्याच निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी सुरक्षा यंत्रणा कडक केली असून अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. चिंतामणीचे दर्शन व आगमन पाहण्यासाठी हजारो भाविक रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत.

रॅपिड ॲक्शन फोर्स तैनात

मुंबई पोलिसांव्यतिरिक्त रॅपिड ॲक्शन फोर्स (आरएएफ) आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तुकड्या या भागात तैनात असणार आहेत.

बॅरिकेड्स आणि पडदे

लालबाग आणि काळाचौकी येथून परळ वर्कशॉपकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्स बसवण्यात आले आहेत. गर्दीचे नियोजन आणि सुरक्षेचा भाग म्हणून या बॅरिकेड्सवर हिरवे पडदे लावण्यात आले आहेत. आगमन सोहळा शांततेत आणि शिस्तीत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

नेपाळमध्ये पुन्हा महापुराची भीती! मृतांचा आकडा ५४७ वर; ३२० भारतीय बेपत्ता; ४०० जण तिबेटच्या सीमेवर अडकले

Nepal Floods : राज्यातील ६० पर्यटकांशी अद्याप संपर्क नाही; २९० जण सुरक्षित, १०५ जण भारताच्या दिशेने रवाना

Maratha Reservation : मागण्या न मानल्यास 'वर्षा'समोर आंदोलन; मनोज जरांगेंचा इशारा, आजपासून उपोषण

Jalna : ब्राह्मण समाजातर्फेही आजपासून उपोषण

Mumbai : दूध १०२ रुपये लिटर; घाऊक दरात ९ रुपये वाढ; १ सप्टेंबरपासून सुटे दूध महागणार