मुंबई

उद्यान वाचवण्यासाठी चिपको आंदोलन: घाटकोपरवासीयांचा पुढाकार; दवाखाना व कब्रस्तानाला विरोध

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी झाडांची लागवड करणे काळाची गरज आहे.

Swapnil S

मुंबई : पर्यावरणाच्या संवर्धनासाठी उद्यान विभागाने घाटकोपर येथील एका जमिनीवर 'मिया वाकी वन' साकारले. यात तब्बल १० हजारांची लागवड केली असून, सद्यस्थितीत हे उद्यान बहरले आहे. परंतु आता मुंबई महापालिकेने या ठिकाणी दवाखाना व कब्रस्तानाचा विस्तार करण्याचे प्रस्तावित केले आहे; मात्र याला स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध केला असून, उद्यान वाचवण्यासाठी चिपको आंदोलन केल्याचे रहिवाशांनी सांगितले.

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी झाडांची लागवड करणे काळाची गरज आहे. पालिकेच्या उद्यान विभागाने मुंबईत हिरवळ निर्माण करण्यासाठी विविध झाडांची लागवड करण्यावर भर दिला आहे. घाटकोपर पश्चिम लाल बहादूर शास्त्री मार्गावर असलेल्या ९ हजार चौरस मीटर उद्यानात १० हजारांहून अधिक झाडांची लागवड केली आहे. या उद्यान व मनोरंजन मैदानात रोज जेष्ठ नागरिकांसह पर्यटक येतात; मात्र या उद्यानात कभरस्तान व दवाखाना प्रस्तावित केला आहे; मात्र पालिकेच्या या भूमिकेला स्थानिकांनी तीव्र विरोध केला असून, या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात केविट दाखल केल्याचे स्थानिक रहिवाशांनी स्पष्ट केले आहे. घाटकोपर पश्चिम येथील मैदानाच्या मागे आधीपासून कब्रस्तान असून, स्थानिकांच्या मागणीनुसार त्याचा विस्तार करण्याबाबत विचाराधीन आहे, असे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

याबाबत विकास नियोजन (डीपी) विभागाकडून प्रस्ताव प्राप्त झाला आहे. परिसरात पर्यायी जागा दिल्यास आम्ही तेथे दुसरे उद्यान विकसित करू, असे विकास नियोजन विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत येथील झाडांना हानी पोहोचणार नाही, याची काळजी घेण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. स्थानिक लोकप्रतिनिधींकडून प्रस्तावाला विरोध करणारी पत्रे मिळाली आहेत. ती पत्रे विकास नियोजन विभागातील अधिकाऱ्यांना पाठवल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’