'सिटीफ्लो'ने मुंबई, दिल्ली मेट्रोचे बुकिंग करता येणार 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

'सिटीफ्लो'ने मुंबई, दिल्ली मेट्रोचे बुकिंग करता येणार

मुंबई आणि दिल्लीतील नागरिक आता 'सिटीफ्लो' ॲपवरून थेट मेट्रोचे तिकीट बुक करू शकणार आहेत. ॲप-आधारित बस सेवा देणाऱ्या 'सिटीफ्लो'ने 'ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स' (ओएनडीसी) च्या माध्यमातून ही मेट्रो तिकीट सेवा आपल्या ॲपमध्ये एकत्रित केली आहे.

प्रतिनिधी

अभिषेक पाठक/मुंबई

मुंबई आणि दिल्लीतील नागरिक आता 'सिटीफ्लो' ॲपवरून थेट मेट्रोचे तिकीट बुक करू शकणार आहेत. ॲप-आधारित बस सेवा देणाऱ्या 'सिटीफ्लो'ने 'ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स' (ओएनडीसी) च्या माध्यमातून ही मेट्रो तिकीट सेवा आपल्या ॲपमध्ये एकत्रित केली आहे. या निर्णयामुळे बस आणि मेट्रोचे बुकिंग एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाले असून, दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांचा बहु-पर्यायी प्रवास अधिक सोपा होणार आहे.

या सुविधेअंतर्गत मुंबई मेट्रोची लाइन १, लाइन २ए, ७ आणि ९ तसेच लाइन ३ (ॲक्वा लाइन) आणि संपूर्ण दिल्ली मेट्रो नेटवर्कचा समावेश करण्यात आला आहे. प्रवासी या ॲपवरून मार्ग शोधू शकतात, एकेरी किंवा परतीचे क्यूआर तिकिटे बुक करू शकतात, ॲपद्वारे पैसे भरू शकतात आणि स्थानकाच्या गेटवर क्यूआर कोड वापरून प्रवेश करू शकतात. एकाच व्यवहारामध्ये कमाल सहा तिकिटे बुक केली जाऊ शकतात. सुरुवातीला यासाठी कोणतेही अतिरिक्त बुकिंग शुल्क आकारले जाणार नाही. 'सिटीफ्लो' कंपनीची स्थापना २०१५ मध्ये स्थापन झाली असून सध्या मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि कोलकाता या शहरांमध्ये १,२०० हून अधिक बसेस चालवते. कंपनीच्या माहितीनुसार दरवर्षी सुमारे १.८ कोटी प्रवासाची सेवा देते. आता मुंबई आणि दिल्लीतील मेट्रो नेटवर्कसाठी मेट्रो तिकीट बुकिंगची सुविधा त्यांच्या ॲपवर उपलब्ध झाली आहे.

प्रवासाचे विविध पर्याय उपलब्ध

हे एकत्रीकरण ॲक्वा लाइन स्थानकांसाठी फिडर बस (फिडर कनेक्टिव्हिटी) जोडण्यासाठी 'सिटीफ्लो' आणि 'मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन' (एमएमआरसीएल) यांच्यात आधीपासून असलेल्या सहकार्याला अधिक मजबूत करते. एमएमआरसीएलचे संचालक आर. रमणा म्हणाले की, एकाच प्लॅटफॉर्मवर फिडर बस सेवा आणि मेट्रो तिकिटे उपलब्ध झाल्यामुळे दैनंदिन प्रवास अधिक सुलभ होईल आणि प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्यासाठी अधिक पर्याय मिळतील.

मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेचा एक भाग

सिटीफ्लोचे सह-संस्थापक आणि सीबीओ ऋषभ शाह म्हणाले की, कंपनी स्वतःला मुंबईच्या व्यापक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा एक भाग मानते, पर्याय नाही. आमच्या ॲपमध्ये मेट्रो तिकिटे उपलब्ध करून देणे ही त्याच भूमिकेची पुढची पायरी आहे. संपूर्ण प्रवास सोपा करणे ही आमची जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : फेरीवाल्यांच्या ओळखपत्रासाठी पावणेदोन कोटींचा खर्च

१५ किलोमीटरसाठी दीड तास! कल्याण-बदलापूर महामार्गावर खड्डे, पाणी अन् कोंडी

वाशीत कौटुंबिक वादातून मुलानेच केली आईची हत्या; आरोपी अटकेत

ठाणेकरांवर करवाढीचे ओझे; प्रशासनाचा प्रस्ताव महासभेत सादर

बारवी ओव्हरफ्लो! ठाणे जिल्ह्याचे पाण्याचे टेन्शन संपले