मोठी बातमी! CJP च्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी नाकारली परवानगी; अभिजीत दिपकेंकडून २ ऑक्टोबरला 'जेल भरो'ची घोषणा (Photo-X)
मुंबई

मोठी बातमी! CJP च्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी नाकारली परवानगी; अभिजीत दिपकेंकडून २ ऑक्टोबरला 'जेल भरो'ची घोषणा

२ ऑक्टोबरचे आंदोलन हे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि भारतीय निवडणूक आयोगाविरोधात सीजेपीने सुरू केलेल्या मोहिमेचा भाग आहे.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई : कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर संस्थापक अभिजीत दिपके यांनी २ ऑक्टोबर रोजी मुंबईत 'जेल भरो' आंदोलनाची घोषणा केली आहे. हे आंदोलन सायंकाळी ४ वाजता होणार असल्याचे दिपके यांनी एक्सवरील पोस्टद्वारे स्पष्ट केले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह CJPच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

'लोकशाही वाचवा'चा नारा

"मुंबईत जेल भरो आंदोलन, २ ऑक्टोबर, शिवाजी पार्क #लोकशाहीवाचवा" अशी संक्षिप्त पोस्ट दिपके यांनी एक्सवर केली आहे. रविवारी दिलेल्या निवेदनात त्यांनी, आंदोलनाला परवानगी न दिल्यास गांधी जयंतीच्या दिवशी मुंबईत जेल भरो आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला होता.

अभिजीत दिपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना उद्देशून आणखी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी "Gyanu Must Go!" असे म्हटले आहे. तसेच, २ ऑक्टोबर रोजी होणारे 'जेल भरो' आंदोलन सायंकाळी ४ वाजता सुरू होणार असल्याचेही दीपके यांनी त्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.

पोलिसांनी सांगितले पर्यायी ठिकाण

मुंबई पोलिसांनी शिवाजी पार्क येथे आंदोलनाला परवानगी देण्याचे अधिकार आपल्याकडे नसल्याचे स्पष्ट केले आहे. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या २०१३ च्या आदेशानुसार आणि त्यानंतरच्या राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शिवाजी पार्क हे 'सायलन्स झोन'मध्ये येते. त्यामुळे आयोजकांना मुंबईतील अन्य ठिकाणाचा पर्याय शोधण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पर्यायी ठिकाणासाठी अर्ज केल्यास त्याचा नियमानुसार विचार केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे

निवडणूक आयोगाविरोधात सीजेपीची मोहीम

२ ऑक्टोबरचे आंदोलन हे ज्ञानेश कुमार आणि भारतीय निवडणूक आयोगाविरोधात सीजेपीने सुरू केलेल्या मोहिमेचा भाग आहे. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास मुंबईपासून देशव्यापी आंदोलन सुरू करण्याची घोषणा सीजेपीने यापूर्वी केली होती.

सीजेपीच्या तीन प्रमुख मागण्या

ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेऊन त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई सुरू करावी, अशी सीजेपीची पहिली मागणी आहे. तसेच मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला (SIR) स्थगिती देऊन जानेवारी २०२५ मधील मतदार यादी पूर्ववत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित २०२३ चा कायदा रद्द करून निवडणूक आयोगात व्यापक सुधारणा कराव्यात, अशीही सीजेपीची मागणी आहे.

SIR वरून निवडणूक आयोगावर प्रश्न

'द इंडियन एक्स्प्रेस'च्या तपासणी अहवालानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी SIR शी संबंधित निर्णय व प्रक्रियांवर गेल्या १० महिन्यांत किमान १४ वेळा आक्षेप नोंदवले होते. काही निर्णय आपल्याला माहिती नसताना घेण्यात आल्याचे त्यांनी नोंदवले होते. मात्र, निवडणूक आयोगाने SIR शी संबंधित निर्णय आयोगाच्या एकमताने घेण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सोन्या-चांदीच्या बाजारात अस्थिरता राहण्याची शक्यता; अमेरिकेची आकडेवारी, पश्चिम आशियातील तणावाचा परिणाम राहणार

Mumbai : २,७५४ मेट्रिक टन साहित्य जमा; विसर्जनानंतर ५१० मेट्रिक टन साहित्याची वाहतूक, स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून प्रभावी सेवा

ओपन एआयने थांबवला टूलचा वापर; AI एजंटची कंपनी इंटरनेट निर्बंधांवर मात

Mumbai : गणेशोत्सवात लालबाग-परळमध्ये चप्पल बुटांचा खच; आठ मेट्रिक टन चप्पल-बूट जमा, पुनर्प्रक्रियेनंतर गरजूंना होणार वाटप

Mumbai : ‘त्या’ रहिवाशांच्या संक्रमण भाड्यात कपात