मुंबई

कोस्टल रोड जानेवारी मुंबईकरांच्या सेवेत:  वरळी ते मरीन लाइन्सपर्यंत मार्गावर प्रवास; प्रकल्पाचे ८३ टक्के काम पूर्ण

प्रियदर्शनी पार्क ते वरळी सी-लिंक दरम्यान मुंबईचा महत्वपूर्ण ठरणारा कोस्टल रोड बनवण्यात येत आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्वपूर्ण ठरणारा कोस्टल रोड जानेवारी अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल, असे नियोजन असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. कोस्टल रोड प्रकल्पाचे ८३ टक्के काम फत्ते झाले असून, उर्वरित काम प्रगतीपथावर असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. वरळी ते मरीन लाइन्स दरम्यान एकूण १०.५८ किमी मार्गापैकी एका बाजूच्या चार लेन जानेवारी अखेरपर्यंत सुरू करण्याचे नियोजन आहे.

मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्पाचे काम ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू करण्यात आले. प्रियदर्शनी पार्क ते वरळी सी-लिंक दरम्यान मुंबईचा महत्वपूर्ण ठरणारा कोस्टल रोड बनवण्यात येत आहे. कोस्टल रोड प्रकल्पामुळे ३४ टक्के इंधनाची तर ७० टक्के वेळेची बचत होणार आहे; मात्र सद्यस्थितीत या प्रकल्पाचे ८३ टक्के काम पूर्ण झाल्याने अंतिम काम पूर्ण होण्यास मे २०२४ उजाडणार आहे. मात्र प्रकल्पाच्या एका बाजूचे काम पूर्ण झाल्याने वरळी ते मरीन लाइन्सपर्यंतचा ९.५ किमीचा मार्ग सुरू करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर पूर्ण प्रकल्प आता मे २०२४ मध्येच मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे.

काम रखडले, खर्च वाढला

-एकूण १०.५८ किमीच्या कोस्टल रोड प्रकल्पात २ किमीचे दोन महाकाय बोगदे तयार करण्यात आले असून, पहिल्या बोगद्याचे काम १० जानेवारी २०२२ ला पूर्ण झाले आहे. तर दुसऱ्या बोगद्याचे काम ३० मे रोजी पूर्ण झाले आहे.

- कोस्टल रोडसाठी सुरुवातीला १२ हजार कोटींचे नियोजन करण्यात आले; मात्र प्रकल्प रखडल्यामुळे प्रकल्पाचा खर्च ७२१ कोटींनी वाढला आहे. तर चार सल्लागारांवर दरमहा होणारा अडीच कोटी खर्च प्रकल्प रखडल्याने किमान १५ कोटींनी वाढला आहे.

महावितरण कंपनीच्या विभाजनावर शिक्कामोर्तब; शेतीच्या वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र कंपनी महावितरणचा IPO येणार

आता राज्यभरातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास चार वर्षांचा होणार; विद्यापीठांमध्ये २०२६-२७ पासून 'ऑनर्स' आणि 'संशोधन' पदवीचे नवे पर्याय उपलब्ध

Mumbai : बेस्टला आर्थिक बळाची गरज; महाव्यवस्थापकांचे पालिका आयुक्तांना निवेदन; एकरकमी ४ हजार कोटी देण्याची मागणी

उरण : आदिवासी वाड्यांची पाण्यासाठी वणवण; रानसई-पुनाडे धरणात अवघा ४७% साठा

आंतरजातीय विवाहामुळे जैन कुटुंबावर सामाजिक बहिष्कार; ठाण्यातील धक्कादायक प्रकार