Mumbai : दुचाकी भिंतीला धडकून कुलाब्यात दोन भावांचा मृत्यू 
मुंबई

Mumbai : दुचाकी भिंतीला धडकून कुलाब्यात दोन भावांचा मृत्यू

कुलाबा येथील नानाभाई मूसा मार्गावर बुधवारी भल्या पहाटे एका दुचाकीचा इमारतीच्या कुंपणाच्या भिंतीला भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या २२ आणि १५ वर्षांच्या दोन भावांचा जागीच मृत्यू झाला.

Swapnil S

पूनम अपराज/मुंबई

कुलाबा येथील नानाभाई मूसा मार्गावर बुधवारी भल्या पहाटे एका दुचाकीचा इमारतीच्या कुंपणाच्या भिंतीला भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या २२ आणि १५ वर्षांच्या दोन भावांचा जागीच मृत्यू झाला.

सुमित वाल्मिकी (२२) आणि त्याचा लहान भाऊ संजू वाल्मिकी (१५) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही कफ परेड येथील गणेशमूर्ती नगरचे रहिवासी होते. ही घटना २३ सप्टेंबरला पहाटे नानाभाई मूसा मार्गावरील उत्तर वाहिनीवर, गंगोत्री इमारतीच्या कुंपणाच्या भिंतीजवळ घडली.

सुमित टीव्हीएस रायडर दुचाकी चालवत असताना त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट कुंपणाच्या भिंतीवर जाऊन धडकली. या अपघातात दोन्ही भावांच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

बँका येत्या रविवारीही राहणार सुरू; अर्थ मंत्रालयाचा मोठा निर्णय

'सुपर एल निनो'मुळे साडेचार लाख लोकांना मृत्यूचा धोका; जगभरात भारतासह आशियाई देशांना तीव्र उष्णतेचा बसणार फटका

Mumbai : एसी, प्रथम श्रेणी पास महागणार! दोन हजारांवरील UPI व्यवहारांवर ५.९० रुपये अतिरिक्त शुल्क लागू होणार

भाजपने भाकरी फिरवली, संघटनेत खांदेपालट

Mumbai : वीजबिल थकबाकीदारांना 'बेस्ट दिलासा'; अभय योजनेला मंजुरी, सोळा हजार ग्राहकांना होणार लाभ