प्रातिनिधिक फोटो
मुंबई

घाटकोपर : ११ वी प्रवेशासाठी लाच मागणाऱ्या कॉलेजच्या अधिकाऱ्याला अटक

तक्रारदार घाटकोपर परिसरात राहत असून त्यांच्या मुलीची अकरावीला कॉमर्समध्ये प्रवेश हवा होता. तिने ऑनलाईन अर्ज करताना सहा कॉलेजची निवड केली होती. मात्र...

Swapnil S

मुंबई : घाटकोपर येथील एका कॉलेजच्या प्रशासकीय अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

रविंद्रनाथ शिवपूजन सिंह असे या अधिकाऱ्याचे नाव असून कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही लाच घेताना त्याच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील तक्रारदार घाटकोपर परिसरात राहत असून त्यांच्या मुलीची अकरावीला कॉमर्समध्ये प्रवेश हवा होता. तिने ऑनलाईन अर्ज करताना सहा कॉलेजची निवड केली होती. मात्र दोन यादी प्रसिद्ध होऊनही तिला प्रवेश मिळाला नव्हता. त्यामुळे तिच्या वडिलांनी नमूद कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी रविंद्रनाथ सिंह यांची भेट घेतली होती. यावेळी त्याने त्यांना तिसर्‍या यादीची वाट बघा असा सल्ला दिला होता. त्यामुळे त्यांनी मुलीच्या प्रवेशासाठी विधानपरिषदेचे आमदार राजहंस धनंजय सिंह यांचे शिफारस पत्र देऊन रविंद्रनाथ सिंह यांची २६ ऑगस्टला भेट घेतली होती. मुलीच्या प्रवेशासाठी त्याने दीड लाखांच्या लाचेची मागणी केली.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी

निकाल हा अनपेक्षित आणि अनाकलनीय - उद्धव ठाकरे