एक्स @mybmc
मुंबई

प्रशासकाच्या कुंचल्याने भरले रंग…! BMC आयुक्तांचा चित्रकला स्पर्धेत सहभाग

चित्रकला हा तसा विद्यार्थ्यांचा आवडीचा विषय. मात्र कॅन्हवास, ब्रश, रंग आणि छंदाला – तेही सरकारी अधिकाऱ्याला सकाळच्या आणि तेही रविवारच्या गुलाबी थंडीची संगत मिळाली तर…

Swapnil S

मुंबई : चित्रकला हा तसा विद्यार्थ्यांचा आवडीचा विषय. मात्र कॅन्हवास, ब्रश, रंग आणि छंदाला – तेही सरकारी अधिकाऱ्याला सकाळच्या आणि तेही रविवारच्या गुलाबी थंडीची संगत मिळाली तर… हा सारा कोलाज उद्यान्याच्या फ्रेममध्ये एकवटला आणि ख-या अर्थाने 'माझी मुंबई'चे सुंदर चित्र तयार झाले.

हे चित्र होते मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत महापौर आयोजित जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बाल चित्रकला स्पर्धे’चे. मुंबई पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी आणि त्यांच्या पत्नीनेही चित्रकलेत सहभाग घेतला.

स्पर्धेच्या माध्यमातून मुंबई मेट्रोपॉलिटन सिटी महिला सशक्तीकरण मी आजीच्या कुशीत, जलसंवर्धन आदी विषयांवर शहरातील ४८ विविध मैदाने आणि उद्यांनात ८८ हजार ७८९ विद्यार्थ्यांनी 'माझी मुंबई' रेखाटली. यंदाचे स्पर्धेचे १६ वे वर्ष आहे.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय येथे बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी भेट देवून स्पर्धेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

CSMT वर शिवाजी महाराजांचा पुतळा होणारच! मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

नागपुरात ‘कॅश बॉम्ब’; अंबादास दानवेंच्या व्हिडीओमुळे खळबळ

लाडक्या बहिणी संतापल्यास घरी बसावे लागेल! मुख्यमंत्र्यांची भाजपच्याच आमदारावर आगपाखड

मतचोरी हे सर्वात मोठे देशद्रोही कृत्य! राहुल गांधी यांचा सरकारवर हल्लाबोल

फलटण महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी ६० दिवसांत आरोपपत्र दाखल करणार! मुख्यमंत्र्यांची सभागृहात माहिती