मुंबई

‘एफडीए’च्या छाप्यात मिठाई, खाद्यतेल जप्त

प्रतिनिधी

सणासुदीच्या काळात भेसळयुक्त खाद्यपदार्थ, मिठाई, भेसळयुक्त तेल विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या ३९ दिवसांत एफडीएने मिठाई, नमकिन व खाद्यपदार्थाचे ९६ नमुने गोळा केले असून, त्यात मिठाईचे ५१, खाद्यतेलाचे ७, तूप व वनस्पती तेलाचे १० अन्य २०९६ नमुने गोळा केल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, मुंबईत मिठाईची एक लाखाहून अधिक दुकाने असून एफडीएची ही कारवाई असून अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे कारवाईला वेग देता आला नाही.

सणासुदीच्या काळात भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री रोखण्यासाठी एफडीएने विशेष मोहीम राबवली होती. ही मोहीम १ ऑगस्टपासून सुरू झाली. एफडीएचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खाद्यपदार्थांच्या तपासणीदरम्यान गुणवत्ता तपासणीच्या उद्देशाने एफडीएच्या अधिकाऱ्यांनी १ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत बाजारात विकल्या जाणाऱ्या मिठाई, नमकिन, तूप आणि खाद्यतेलाचे नमुने गोळा करण्यास सुरुवात केली. ३१ ऑगस्टपासून उत्सवाला सुरुवात झाली असताना, उत्सवाची तयारी आधीच सुरू झाल्यामुळे एफडीएने उत्सवापूर्वी मोहीम सुरू केली. एफडीएच्या आकडेवारीनुसार, संपूर्ण शहरातून ९६ नमुने घेतले. ८ सप्टेंबरपर्यंत ९६ नमुन्यांपैकी मिठाईचे ५१ नमुने, फराळाचे सहा नमुने, खाद्यतेलाचे सात नमुने, तूप व वनस्पती तेलाचे १० नमुने, इतर उत्पादनांचे २२ नमुने घेण्यात आले. याशिवाय एफडीएने निकृष्ट दर्जाच्या संशयावरून ४,८४,८२२ रुपये किमतीचे सुमारे २,४०० लिटर खाद्यतेल जप्त केले असून त्याचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. चॉकलेट आणि चहा पावडर जप्त करण्यात आली आहे.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल