Mumbai : सेव्हन हिल्स रुग्णालय खासगी संस्थेला देण्यास विरोध; सुधार समितीत तीव्र विरोध करणार, गटनेते अश्रफ आजमी यांचा इशारा  संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : सेव्हन हिल्स रुग्णालय खासगी संस्थेला देण्यास विरोध; सुधार समितीत तीव्र विरोध करणार, गटनेते अश्रफ आजमी यांचा इशारा

अंधेरी मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालय खासगी संस्थेला देण्यास विरोध वाढला आहे.‌ आता काँग्रेस पक्षाने विरोधाचे हत्यार उपसले असून बुधवारच्या सुधार समितीच्या बैठकीत विरोध करणार असल्याचा इशारा काँग्रेसचे गटनेते अश्रफ आजमी यांनी दिला.

Swapnil S

मुंबई : अंधेरी मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालय खासगी संस्थेला देण्यास विरोध वाढला आहे.‌ आता काँग्रेस पक्षाने विरोधाचे हत्यार उपसले असून बुधवारच्या सुधार समितीच्या बैठकीत विरोध करणार असल्याचा इशारा काँग्रेसचे गटनेते अश्रफ आजमी यांनी दिला.

या रुग्णालयाची जागा ही ६० एकर असून हा प्लॉट एअरपोर्टजवळ असल्याने या प्लॉटची किंमत ५ ते १ हजार करोडच्या दरम्यान आहे. पालिकेने या ठिकाणी १५०० बेड आणि २० टक्के बेड रुग्णांना उपचार करण्याची अट घातल्यावर हे रुग्णालय सेव्हन हिल रुग्णालयाला लीजवर दिले होते. परंतु रुग्णालयाने प्रॉपर्टी टॅक्स व लीज रेंट भरली नाही. त्यामुळे २०१८ मध्ये या रुग्णालयाला नोटीस दिली होती. त्या नोटिसीवर या रुग्णालयाने कोणताही रिप्लाय दिला नव्हता. त्यानंतर हे प्रकरण एनसीएलटीमध्ये गेले. त्यानंतर महापालिकेने सुप्रीम कोर्टमध्ये केस दाखल केली.

सुधार समितीत प्रस्तावच आला नाही

हे प्रकरण अजूनही प्रलंबित आहे. त्यानंतर १२ डिसेंबर २०२५ ला कॅप्री ग्लोबल सोबत नवीन करार करण्यात आला आणि १५ डिसेंबर २०२५ ला आचारसंहिता लागायच्या आधीच या प्रस्तावावर महापालिकेने संबंधित कॅप्री ग्लोबलला एनओसी दिली. त्यानंतर येत्यात २७ मे ला सुधार समितीमध्ये हा विषय येणार आहे. जर मागील सुधार समितीमध्ये हा प्रस्तावच आला नाही तरीदेखील महापालिकेने केप्रि ग्लोबल सोबत करार करून हे रुग्णालय त्यांना कोणत्या आधारावर दिले. महापालिकेने २०१४-१५ मध्ये दिलेले टेंडर रद्द करायला हवे होते. परंतु तसे झाले नाही. कोरोना काळामध्ये याच सेव्हन हिल्स रुग्णालयाने मुंबईकरांचा जीव वाचवला होता. परंतु आता हे रुग्णालय केप्री ग्लोबलला देण्याचा घाट घातला आहे. याला आम्ही विरोध करत मुंबईकरांच्या पाठी आम्ही ठामपणे उभे राहणार आहोत, असे आजमी म्हणाले.

भाजपच्या चुकीच्या धोरणाला विरोध

आज भाजप महापालिकेमध्ये शंभर दिवस झाल्याचा उत्सव साजरा करत आहे. परंतु त्यांनी प्रत्येक वस्ती योजनेमध्ये काम करण्यासाठी कामगार कमी आहेत याचा उल्लेख त्यांनी केला नाही, तर सीएसआर फंडाच्या माध्यमातून भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने महापालिकेला मशीनसाठी १४ कोटी दिले होते. परंतु टेंडर आणि प्रस्तावच रद्द केला. गारगाई धरणामध्ये या सत्तेतील भाजपने प्रस्ताव दोन कोटीने वाढवून लोकांची दिशाभूल केली. मराठी शाळादेखील बंद केल्या जात आहेत, पालिकेतील शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे भाजपच्या चुकीच्या धोरणाला विरोध करणार आहोत, असे अश्रफ आजमी म्हणाले.

ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर हल्ला; १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

सायबर भामट्यांनी खाते रिकामे केले? घाबरू नका; पैसे परत मिळवण्यासाठी अशी करा तक्रार

व्हिडीओ एडिटिंग येत नाही? फक्त काही टॅप्समध्ये साधा व्हिडीओ होईल सिनेमॅटिक; Google Photos चं नवं एआय फीचर लॉन्च

Palghar Landslide : तांदुळवाडी किल्ल्याजवळ दरड कोसळली; पर्यटकांसाठी प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Mumbai : 'मराठीत बोला' म्हणणाऱ्या प्रवाशाला दोन तास RPF कार्यालयात बसवून ठेवले; व्हायरल VIDEO ची रेल्वेकडून चौकशी