आदित्य ठाकरे संग्रहित छायाचित्र
मुंबई

मुंबई तोडण्याचे षडयंत्र; शिवसेना नेते आदित्य ठाकरेंचा भाजपवर आरोप

२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यावेळी भाजपचे काही नेते मातोश्रीवर आले आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत चर्चा करत शब्द दिला होता.

Swapnil S

मुंबई : २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यावेळी भाजपचे काही नेते मातोश्रीवर आले आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत चर्चा करत शब्द दिला होता. मात्र सवयीप्रमाणे भाजपने शब्द फिरवला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप सत्तेत आले; मात्र सत्तेत येताच विकासकांच्या पाठीशी उभी आहे. मुंबई तोडण्यासाठी भाजपने षडयंत्र रचले असून मुंबई महाराष्ट्रात ठेवण्यासाठी लढलेच पाहिजे, असा निर्धार युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी निर्धार शिबिरात केला.

मुंबईसाठी लढले नाही तर मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार, त्यामुळे मुंबईला वाचवण्यासाठी आपणच सूर्योदय करायचा आहे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने मतदारसंघांत मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने निर्धार शिबिरांचे आयोजन ईशान्य मुंबईत केले होते. या शिबिरात ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मिमिक्री करत हल्लाबोल केला. जुने भाजपचे नेते अजूनही सांगतात की, आपले सरकार आले कसे, असा हल्लाबोल करत ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

दिवाकर रावते यांनी आमच्या चार पिढ्यांसोबत काम केले आहे. रावते यांच्याबरोबर सभागृहात काम करण्याची संधी मिळाली. मी मंत्री असताना तिथे बोलताना एक जरी शब्द इकडे तिकडे झाला तरी त्यांचा फोन यायचा. रावते यांनी मराठवाड्यात काम केले. मुंबईत राहणाऱ्या नेत्याने गरीब शेतकऱ्यांसाठी काम केले. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना सुभाष देसाई यांनी पक्षात जबाबदारी घेतली. राजन विचारे यांना किती दबाव दिला जातोय हे सर्वांनी सांगितले. क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया संघ आहे. त्यात स्टीव वॉ आणि मार्क वॉ हे दोन बंधू आहेत. आपल्यात हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या बंधू आहेत, तसे सुनील राऊत आणि संजय राऊत आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

जनतेसमोर वोटर फ्रॉड आणणार

विधानसभा निवडणुकीत भ्रष्टाचार, गद्दारी, उद्योग गुजरातला हे विषय घेऊन मविआ जनतेसमोर गेली. मात्र वोटर फ्रॉड केल्याने भाजप विजयी झाली. विधानसभा निवडणुकीत वोटर फ्रॉड झाला हे संजय राऊत, सुप्रिया सुळे आणि राहुल गांधी यांनी जनतेसमोर मांडले आहे. आता पुन्हा एकदा वोटर फ्रॉड जनतेसमोर आणणार, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी भाजपला दिला. आजची भाजप कंत्राटदार लोकांची आहे, असे अडवाणी, वाजपेयी यांच्या काळातील भाजपचे जुने नेते सांगतात, असे ठाकरे म्हणाले.

मुंबईचे आर्थिक महत्त्व कमी करण्याचा भाजपचा डाव; ‘महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम’

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी रविवारी महाराष्ट्र सरकारवर मुंबई शहराचे आर्थिक महत्त्व पद्धतशीरपणे कमी करण्याचा आरोप केला. यामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या वाईट परिणामाबद्दलही आदित्य ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला. मुंबईतल्या बेस्ट बसेसची संख्या कमी करून बेस्टवर आर्थिक ताण निर्माण करण्याचा पद्धतशीरपणे आखलेला डाव हा मुंबईचे महत्त्व कमी करण्याच्या व्यापक धोरणाचाच भाग आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला.

पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना ठाकरे यांनी मुंबईसाठी गुजरातच्या जीआयएफटी सिटी (गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी) सारखी सुविधा देण्याची मागणी केली. मुंबई महानगराचे आर्थिक महत्त्व सुनियोजितपणे कमी करण्याचा घाट घालण्यात आला असल्याचा आरोप केला.

माजी राज्य मंत्री ठाकरे यांनी आरोप केला की बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट (BEST) उपक्रमावर सरकारकडून जाणीवपूर्वक आर्थिक ताण निर्माण केला जात आहे. यासाठीच बेस्टच्या ताफ्यातील ४००० बसेसची संख्या आता केवळ १५००-२००० पर्यंत कमी करण्यात आली आहे.

सत्ताधारी भाजपवर हल्ला चढवताना ठाकरे यांनी दावा केला की मोठे प्रकल्प आणि काही कंपन्यांची मुख्यालये मुंबईहून गुजरात आणि दिल्लीकडे हलवली जात आहेत. मुंबईचे आर्थिक कणा जाणीवपूर्वक कमजोर केला जात आहे, याने मुंबईला कसा फायदा होईल? झारखंड आणि वाराणसीमध्ये (उत्तर प्रदेश) लोक विचारतात की नवा प्रकल्प इतर राज्यांऐवजी गुजरातकडे का जात आहे, असे ठाकरे म्हणाले.

मुंबईतील वांद्र्यातून आमदार असलेल्या ठाकरे यांनी म्हटले की, सार्वजनिक परिवहन सेवांची ही दीन अवस्था हे एक मोठ्या कटाचा भाग आहे. कॉर्पोरेट कंपन्यांकडून मुंबईच्या जमिनींवर कब्जा करण्यासारख्या महत्त्वाच्या समस्यांपासून ज्याने लोकांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

लाल बस नाहीशा

२०२७ पर्यंत, १०,००० इलेक्ट्रिक बसेस,सुरू करण्याचा योजना केली होती. यात ९०० डबलडेकर्स बसचा समावेश होता. आता, मुंबईची ओळख असलेल्या लाल बसदेखील नाहीशा होत आहेत. लाल बस मुंबईचे प्रतीक होती, मात्र आज ती तुम्हाला जाहिरात होर्डिंगसारखी दिसते, असे ठाकरे यांनी सांगितले.

ग्रँड मुफ्तींच्या प्रयत्नांना यश; निमिषा प्रियाला मोठा दिलासा, येमेन सरकारकडून फाशी तुर्तास स्थगित

पती-पत्नीचा 'सिक्रेट' कॉल पुरावा म्हणून ग्राह्य: घटस्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

वडापाव, समोसा, कचोरी म्हणजे लठ्ठपणाला आमंत्रण; आरोग्य खाते सर्वत्र फलक लावणार

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी