संग्राहित छायाचित्र
मुंबई

नव्या नियुक्तीचा पूर्वीच्या कालावधीशी संबंध नाही; पेन्शन गणनेबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबई : पेन्शन गणनेच्या सेवा कालावधीसंदर्भात उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. एकदा सेवेतून काढल्यानंतर पुन्हा नव्याने करण्यात आलेली नियुक्ती पूर्वीच्या सेवा कालावधीशी जोडली जाऊ शकत नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे.

Swapnil S

मुंबई : पेन्शन गणनेच्या सेवा कालावधीसंदर्भात उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. एकदा सेवेतून काढल्यानंतर पुन्हा नव्याने करण्यात आलेली नियुक्ती पूर्वीच्या सेवा कालावधीशी जोडली जाऊ शकत नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. पेन्शनचा कालावधी ठरवताना आधी केलेल्या सेवेचा कालावधीही त्यात जोडण्यात यावा, अशी मागणी रिट याचिकेतून केली होती. ही विनंती न्यायालयाने अमान्य केली.

मागील सेवा समाप्त झाली असेल आणि कालांतराने योग्य निवड प्रक्रियेनंतर केलेली पुनर्नियुक्ती पेन्शन गणनेसाठी नव्याने विचारात घेतली जाईल. आधीच्या सेवा कालावधीचा नव्या सेवा कालावधीच्या पेन्शन गणनेवेळी विचार केला जाऊ शकत नाही, असे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या खंडपीठाने स्पष्ट करत याचिका फेटाळून लावली.

मुंबईतील सोमाणी महाविद्यालयाने १९८६ मध्ये डॉ. व्ही. एन. मधु यांची जीवशास्त्रातील सहाय्यक शिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. ही नियुक्ती राखीव रिक्त जागेवर तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली होती. तथापि, २० जून १९८७ रोजी त्यांची सेवा समाप्त करण्यात आली. त्यांनी त्या सेवा समाप्तीला शाळासंबंधित न्याायाधीकरणापुढे आव्हान दिले होते.

न्यायाधिकरणाने पुन्हा कामावर रूजू करून घेण्याबाबत आदेश देण्यास नकार दिला. त्याऐवजी याचिकाकर्त्या डाॅ. मधु यांना भरपाई म्हणून एक महिन्याचा पगार देण्याचे निर्देश महाविद्यालयाला दिले. त्या निर्णयाला आव्हान देत डॉ. मधु यांनी रिट याचिका दाखल केली. डॉ. मधू यांची सुरुवातीची नियुक्ती राखीव पदावर तात्पुरती होती व ती कोणत्याही रिक्त पदाच्या जागी नसल्याने रद्द केली होती.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल