Mumbai : RPF कॉन्स्टेबलला पुन्हा रुग्णालयात पाठवा; न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला निर्देश  (Photo-X)
मुंबई

Mumbai : RPF कॉन्स्टेबलला पुन्हा रुग्णालयात पाठवा; न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला निर्देश

२०२३ मध्ये लांब पल्ल्याच्या गाडीत चार जणांच्या हत्येचा आरोप असलेल्या माजी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंग चौधरी याला पुन्हा ठाणे मानसिक रुग्णालयात हलवण्याचे निर्देश मुंबईतील एका न्यायालयाने कारागृह प्रशासनाला दिले आहेत.

Swapnil S

मुंबई : २०२३ मध्ये लांब पल्ल्याच्या गाडीत चार जणांच्या हत्येचा आरोप असलेल्या माजी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंग चौधरी याला पुन्हा ठाणे मानसिक रुग्णालयात हलवण्याचे निर्देश मुंबईतील एका न्यायालयाने कारागृह प्रशासनाला दिले आहेत. त्याच्या मानसिक आरोग्याबाबतचा अहवाल सादर करताना ‘तो खटल्याला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहे की नाही’ याबाबत स्पष्ट मत मांडण्यास सांगितले आहे.

चौधरी याला यापूर्वी २० फेब्रुवारी ते १२ जुलै २०२५ या कालावधीत प्रादेशिक मानसिक रुग्णालय, ठाणे येथे दाखल करण्यात आले होते. आरोपी सध्या ठाणे कारागृहात आहे

अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रवीण चतुर यांनी आरोपीने मानसिक आरोग्याच्या कारणास्तव दाखल केलेल्या जामीन अर्जानंतर दरम्यान, आरोपी चौधरीला अधिक चांगल्या व्यवस्थापन आणि उपचारांसाठी पुढील आदेशापर्यंत ठाणे मानसिक रुग्णालयात दाखल करण्याचे न्यायालयाने दिले. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दर १५ दिवसांनी आरोपीच्या उपचाराबाबत आणि मानसिक आरोग्याबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले.

प्रकृती स्थिर

कारागृहाने जानेवारीत सादर केलेल्या वैद्यकीय अहवालात म्हटले होते की, १८ डिसेंबर रोजी झालेल्या तपासणीत चौधरीची प्रकृती ‘स्थिर’ आढळली होती. आरोपी चौधरी याचे रक्तदाबासह सर्व शारीरिक मापदंड सामान्य होते आणि मध्यवर्ती मज्जासंस्थेत कोणतीही तात्काळ विकृती दिसून आली नव्हती.

Kolkata Hotel Fire: हॉटेलमध्ये आगीचा भडका! झोपेतच ९ जणांचा दुर्दैवी अंत, ६ जण जखमी; VIDEO

भारतातील रुग्णालयांचे दर हे हिमनगाचे टोक; आरोग्य सेवा क्षेत्र भांडवलप्रधान असल्याचा नॅटहेल्थचा अहवाल

कोरमअभावी टाटा सन्सची AGM अखेर तहकूब

Mumbai : पालिका मुख्यालयातील उपाहारगृह तत्काळ सुरू करा; महापौर रितू तावडेंचे निर्देश

परिणामांबाबतचा संदेश स्पष्ट; कृती, संवेदनशीलतेचे प्रदर्शन, Meta सोबतच्या चर्चेवर सरकारी अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया