मुंबई

पंधरा लाखांची कॅश पळविणाऱ्या नोकराविरुद्ध गुन्हा

सुमारे पंधरा लाखांची कॅश पळविणाऱ्या दोन नोकरांविरुद्ध एमएचबी पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदविला आहे.

Swapnil S

मुंबई : सुमारे पंधरा लाखांची कॅश पळविणाऱ्या दोन नोकरांविरुद्ध एमएचबी पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदविला आहे. अली अल्ताफ शेख असे या दोन नोकरांची नावे असून या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. ६२ वर्षाचे वयोवृद्ध तक्रारदार रियल इस्टेट व्यावसायिक आहेत. त्यांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून, त्यांच्याकडे अली आणि अल्ताफ हे दोघेही कामाला होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे तीन ते चार जागेचे व्यवहार सुरू होते. त्यासाठी त्यांच्या परिचित व्यक्तीकडून पंधरा लाख रुपये घेतले होते. ही रक्कम घेण्यासाठी त्यांनी अली आणि अल्ताफला पाठविले होते.

ही रक्कम दिल्यानंतर त्यांनी फोनवरुन या दोघांनाही पंधरा लाख रुपये दिल्याचे सांगितले. त्यांनीही कॉलवर ही रक्कम घेऊन कार्यालयात येत असल्याचे सांगितले. मात्र रात्री उशिरापर्यंत ते दोघेही पंधरा लाख रुपये घेऊन आले नाही. त्यांनी त्यांना वारंवार कॉल केल;मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. नंतर अली आणि अल्ताफने त्यांचे फोन बंद केले होते. ते दोघेही पंधरा लाखांची कॅश घेऊन पळून गेल्याची खात्री होताच त्यांनी एमएचबी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अली आणि अल्ताफविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदविला आहे. दोन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

Pune Rain : उकाड्याने हैराण पुणेकरांना पावसाचा दिलासा! शहरातील अनेक भागांत बरसल्या सरी

NEET UG 2026 Re-Exam : उशिरा पोहोचल्याने दोन विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारला; गेट बंद होताच गोंधळ

BEST संपामुळे महामुंबई मेट्रोचा नवा विक्रम; एका दिवसात ३ लाख ५७ हजारांहून अधिक प्रवाशांचा प्रवास

Mumbai : 'एलटीटी'त ५६ तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक; अनेक एक्स्प्रेस गाड्यांवर होणार परिणाम

"माझ्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही..."; हैदराबादमध्ये NEET पुनर्परीक्षेआधीच टोकाचं पाऊल, १९ वर्षीय विद्यार्थिनीने संपवलं जीवन