मुंबई

Crime : मुलीला भिक मागण्यास आईनेच केले प्रवृत्त

या गुन्ह्यांचा तपास सुरू असून, तिच्या मुलीला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे

नवशक्ती Web Desk

पतीच्या निधनानंतर कुठलाही कामधंदा न करता स्वत:च्या दहा वर्षांच्या मुलीला भिक मागण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रिया नावाच्या एका ३५ वर्षांच्या महिलेविरुद्ध गावदेवी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

शुक्रवारी, ५ मे रोजी गावदेवी पोलिसांचे एक विशेष पथक परिसरात गस्त घालत होते. रात्री पावणेनऊ वाजता या पथकाला गावदेवी येथील नाना-नानी चौक, हिंदू हॉटेलसमोर एक मुलगी हॉटेलमध्ये जाणाऱ्या आणि बाहेर येणाऱ्या ग्राहकासह रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांकडे भीक मागत असल्याचे दिसून आले. बराच वेळ होऊन तिच्याजवळ कोणी आले नाही. ती एकटीच तिथे भिक मागत होती. त्यामुळे या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिची विचारपूस केल्यानंतर तिला तिची आई प्रिया हिनेच भीक मागण्यास प्रवृत्त केल्याचे सांगितले.

प्रिया ही घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगरात राहत असून, तिच्या पतीचे निधन झाले आहे. ती काहीच कामधंदा करत नाही. तिच्या मुलीला भीक मागण्यास प्रवृत्त करून स्वत:चा कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवीत होती. या जबानीनंतर तिला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले होते. याप्रकरणी सचिन दशरथ उगले या पोलीस शिपायाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी प्रियाविरुद्ध महाराष्ट्र भिक्षेकरी प्रतिबंधक कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरू असून, तिच्या मुलीला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगेंची मोठी घोषणा; मोर्चा मुंबईत धडकणार, जाण्याचा मार्गही ठरला

महाबळेश्वर-पाचगणी परिसरात स्ट्रॉबेरी लागवडीची लगबग सुरू; मजूर टंचाई, वाढती रोजंदारी आणि उत्पादन खर्चामुळे शेतकरी चिंतातूर

इंटरनेटशिवाय UPI पेमेंट? RBI च्या नव्या सुविधेने काय बदलणार? जाणून घ्या सविस्तर

Karjat : लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी; मूर्तीवर शेवटचा हात फिरविण्यात कलाकार मग्न

SRA कडून ४५० हून अधिक निष्क्रिय विकासकांची हकालपट्टी