Mumbai : झाडांवर विषप्रयोग केला तर थेट गुन्हा दाखल होणार; बाजार व उद्यान समिती अध्यक्ष हेतल गाला यांचे निर्देश 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : झाडांवर विषप्रयोग केला तर थेट गुन्हा दाखल होणार; बाजार व उद्यान समिती अध्यक्ष हेतल गाला यांचे निर्देश

३१ मे पर्यंत मुंबईतील आणि रेल्वे हद्दीतील धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात यावी.

Swapnil S

मुंबई : रस्त्यांच्या दुतर्फा धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात यावी. ३१ मे पर्यंत मुंबईतील आणि रेल्वे हद्दीतील धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात यावी. मात्र विकासक, कंत्राटदार किंवा एखाद्या व्यक्तीने झाडाला जाणीवपूर्वक मारण्याचा, त्यावर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला तर थेट गुन्हा दाखल करावा, असे सक्त निर्देश बाजार व उद्यान समिती अध्यक्षा हेतल गाला यांनी पालिकेला दिले आहेत.

मुंबईतील सर्व झाडांच्या फांद्या किंवा काही फांद्या रस्ते, पदपथ किंवा सार्वजनिक मार्गाकडे धोकादायकरित्या झुकलेले आहेत, त्याची तातडीने पाहणी करून पावसाळयापूर्वी छाटणी करण्यात यावी. धोकादायक झाडे फांद्या यामुळे कोणताही अपघात होणार नाही, याची दक्षता घ्यावी. खासगी मालमत्ता, गृहनिर्माण संस्था, इमारती इत्यादींनीही धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करून घ्यावी, असे आवाहन हेतल गाला यांनी मुंबईकरांना केले आहे.

झाडांची नियमित तपासणी होणार

महापालिका, एसआरए, अथवा इतर सक्षम प्राधिकरणांच्या अखत्यारित सुरू असलेल्या बांधकामस्थळांवरील झाडांची विभागनिहाय व प्रभागनिहाय नियमित तपासणी करण्यात यावी. जर कोणत्याही विकासक, कंत्राटदार किंवा संबंधित व्यक्तींकडून जाणीवपूर्वक झाडे वाळवणे, नुकसान करणे किंवा बेकायदेशीर पद्धतीने झाडे मृत करण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनाला आल्यास संबंधित दोषीविरुद्ध तात्काळ एफआयआर दाखल करण्यात यावा, असे सक्त आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.

झाडांची काळजी न घेणाऱ्या कंत्राटदाराला दंड

मुंबईत सुरू असलेल्या रस्ते बांधकामांची विभागनिहाय पाहणी करून झाडांच्या सभोवती योग्य प्रकारे ट्री गार्ड व लाल माती टाकण्यात आलेली आहे की, नाही याची खात्री करण्यात यावी. ज्या ठिकाणी ट्री गार्ड उभारण्यात आलेले नाहीत. अयोग्य पद्धतीने बांधलेले आहेत किंवा झाडांचे संरक्षण करण्यात आलेले नाही, त्या संबंधित कंत्राटदार / यंत्रणांवर दंडात्मक कारवाई करून आवश्यक दंड व वसुली करण्यात यावी. संबंधित कार्यवाही ही त्या कामाच्या अधिकारक्षेत्रातील रस्ता विभागामार्फत करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

Jio-Airtel चा Vi ला दणका; मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीवरून TRAI कडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?

Mumbai : मेट्रो ९ टप्पा २ साठी विशेष वाहतूक ब्लॉक; १५ ते २५ सप्टेंबर दरम्यान सकाळी वाहतूक उशीरा सुरू होणार

Mumbai : दादर पूर्व स्टेशन परिसर होणार कोंडीमुक्त; टॅक्सी, बेस्टसाठी स्वतंत्र मार्गीका, टॅक्सी स्टँड

परिचारिकांना महिन्याला आठ सुट्या द्या; राज्य शासनाच्या धर्तीवर ४० तासांचा आठवडा करा, परिचारिका संघटनेने BMC चे लक्ष वेधले

Pune : "ज्येष्ठ नेतृत्व काळाच्या पडद्याआड"; माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांचे निधन, राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली अर्पण