छायाचित्र : विजय गोहिल
मुंबई

CSMT स्थानकातील प्लॅटफॉर्म १८ राहणार बंद; पुनर्विकासासाठी ८० दिवस फलाट बंद; दोन एक्स्प्रेस दादरपर्यंतच चालणार

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) पुनर्विकास कामानिमित्त १ ऑक्टोबर ते १९ डिसेंबर या कालावधीत प्लॅटफॉर्म क्रमांक १८ वर ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. या कामामुळे १८ क्रमांकाचा फलाट ८० दिवस बंद राहणार आहे.

Swapnil S

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) पुनर्विकास कामानिमित्त १ ऑक्टोबर ते १९ डिसेंबर या कालावधीत प्लॅटफॉर्म क्रमांक १८ वर ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. या कामामुळे १८ क्रमांकाचा फलाट ८० दिवस बंद राहणार आहे. परिणामी आणि अमरावती-सीएसएमटी बल्लारशाह-सीएसएमटी एक्स्प्रेस दादर स्थानकापर्यंतच चालविण्यात येणार आहेत. रेल भूमी विकास प्राधिकरण (आरएलडीए) मार्फत मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १८ वर ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकदरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक १८ वर पायाभूत कामे व सुरक्षा बॅरिकेड्स उभारण्याची कामे केली जातील.

मध्य रेल्वेने २६ सप्टेंबरपासून मोठा ब्लॉक जाहीर केला आहे. तो १० ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. या अंतर्गत देखभाल आणि अद्ययावतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या दरम्यान लोकल तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा प्रभावित होत आहेत. मेगा ब्लॉक दरम्यान सायन स्टेशनवर नवीन फूट ओव्हर ब्रिजकरिता गर्डर बसविण्याचे प्रमुख काम सध्या वेगात सुरू आहे.

मध्य मुंबईतील पश्चिम व पूर्व महानगरांना जोडणाऱ्या एलफिन्स्टन पूल पाडण्याचे काम १२ सप्टेंबरपासून सुरू झाले आहे. पूल पाडण्याचे तसेच राडारोडा हटवण्याच्या कामासाठी लागणाऱ्या वाहनांचीच तेवढी वर्दळ परिसरात आहे.

बदलीच्या तक्रारीसाठी पोलिसांना कार्यालयात आणणे गैरवर्तन; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

Mumbai Rain : मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण! ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर परिणाम, पुढील ४८ तास महत्त्वाचे

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार