Mumbai : सीएसएमटी येथील फलाट विस्तारासाठी दहा दिवसांचा ब्लॉक; अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्या दादर व ठाणे येथेच संपणार संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : सीएसएमटी येथील फलाट विस्तारासाठी दहा दिवसांचा ब्लॉक; अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्या दादर व ठाणे येथेच संपणार

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील फलाट क्रमांक १६ आणि १७ च्या पुनर्विकास व विस्तारीकरणाच्या कामासाठी मध्य रेल्वेने २९ मेपासून १० दिवसांचा ब्लॉक घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील फलाट क्रमांक १६ आणि १७ च्या पुनर्विकास व विस्तारीकरणाच्या कामासाठी मध्य रेल्वेने २९ मेपासून १० दिवसांचा ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉकमुळे काही मेल, एक्स्प्रेसच्या सेवा अंशतः रद्द करण्यात येणार आहेत. यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

सीएसएमटी स्थानकाच्या आधुनिकीकरणाचे काम 'रेल्वे जमीन विकास प्राधिकरण' मार्फत (आरएलडीए) सुरू आहे. या कामासाठी फलाट क्रमांक १६ आणि १७ वर पायाभूत सुविधा निर्माण करण्याची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे काही रेल्वेगाड्यांचे अंतिम थांबे तात्पुरते बदलण्यात आले आहेत. यामध्ये गाडी क्रमांक २२१२० मडगाव ते सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस ही २९ मेदरम्यान दादर स्थानकावरच समाप्त होईल. तसेच गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरू ते सीएसएमटी एक्स्प्रेस ही याच कालावधीत ठाणे स्थानकावरच समाप्त करण्यात येणार आहे.याशिवाय २९ मेपासून काही 'अप' मेल/एक्स्प्रेस गाड्या अंशतः दादर येथे समाप्त होणार आहेत.

त्यामध्ये गाडी क्रमांक १२११२ अमरावती ते सीएसएमटी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक ११००२ बल्लारशाह ते सीएसएमटी नंदीग्राम एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२८१० हावडा ते सीएसएमटी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक ११०२० भुवनेश्वर ते सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस, गाडी क्रमांक २२१४४ बिदर ते सीएसएमटी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक २२१०८ लातूर ते सीएसएमटी एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक २२१२० मडगाव ते सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे. तर गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरू ते सीएसएमटी एक्स्प्रेस ही ठाणे येथे समाप्त होणार आहे.

Mumbai : कालिदास स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील सक्तीच्या कारवाईला स्थगिती; हायकोर्टाने BMC ला फटकारले

Mumbai : सेवानिवृत्त अधिकारीच मागच्या दाराने सल्लागार म्हणून येतात; स्थायी समितीत गणेश खणकर यांचा आरोप

चार संरक्षण कॉरिडॉर उभारण्यास मान्यता; मुख्यमंत्र्यांची माहिती

Mumbai : विजेच्या मागणीचा उच्चांक; द. मुंबईत वारंवार बत्ती गुल, गिरगाव, दादर, वडाळ्यात नागरिक हैराण

भारत सर्वात मोठा शस्त्र निर्यातदार होईल - राजनाथ सिंह