Mumbai : सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत 
मुंबई

Mumbai : सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरात गुरुवारी सकाळी सिग्नल यंत्रणेशी संबंधित बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.

Swapnil S

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरात गुरुवारी सकाळी सिग्नल यंत्रणेशी संबंधित बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या खोळंब्यामुळे हजारो प्रवाशांचे हाल झाले. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लॅटफॉर्म क्रमांक ११ ते १४ दरम्यान ही घटना घडली. येथे एका इंजिनाने लाल सिग्नल ओलांडल्याने (एसपीएडी) सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता.

सीएसएमटी स्थानकाच्या यार्डमध्ये सकाळी ६:५० ते ७:२० च्या दरम्यान ‘अप थ्रू लाइन’वर रिकाम्या डब्यांची आणि इंजिनाची ने-आण करण्याचे काम सुरू होते. या प्रक्रियेदरम्यान सिग्नलचे उल्लंघन झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गाड्यांच्या वाहतुकीवर तत्काळ निर्बंध आणण्यात आले. यामुळे ‘अप’ मार्गावरील गाड्या २५ ते ३५ मिनिटे उशिराने धावत होत्या. सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना आणि उपनगरीय प्रवाशांना याचा मोठा फटका बसला. रेल्वे प्रशासनाने तत्काळ उपाययोजना केल्याने हळूहळू वाहतूक पूर्वपदावर आली. सिग्नल नियमांचे उल्लंघन नेमके कशामुळे झाले याचा सविस्तर तपास रेल्वेकडून केला जात आहे.

रस्त्याच्या कामावरून प्रश्न विचारताच तरुणाच्या लगावली कानशिलात; मंत्री प्रवेश वर्मांचा Video सोशल मीडियावर व्हायरल

NCMC Card : अजून कार्ड काढलं नाही? १ ऑक्टोबरपूर्वी करा नोंदणी; कुठे अन् कशी करायची? वाचा संपूर्ण प्रक्रिया

Video : आशुतोष रांकांसह CJP चे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; सुटका न झाल्यास आसामला जाणार, अभिजीत दिपकेंचा इशारा

Mumbai : अनंत चतुर्दशीला नाही तर अंगारकी संकष्टीला होते अंधेरीच्या राजाचे विसर्जन; जाणून घ्या खास परंपरा

LPU Students Protest : बलात्काराच्या अफवेने विद्यार्थ्यांचा उद्रेक; कॅम्पसमध्ये जाळपोळ, महामार्गही रोखला, Video