प्रातिनिधिक छायाचित्र  
मुंबई

Mumbai : दादर स्थानकातील मोठ्या पुलावर प्रवेश बंदी; रेल्वे पोलिसांचा कडक बंदोबस्त

५ व ६ डिसेंबर रोजी बाबासाहेबांच्या अनुयायांची होणारी गर्दी लक्षात घेता दादर रेल्वे स्थानकातील पूर्व व पश्चिम जोडणारा मध्य मोठा फलाट क्रमांक १२ वरील सर्व प्रवेशद्वार शहर हद्दीतून येणारा पूल रेल्वे अनुयायी व प्रवाशांच्या प्रवेशांसाठी बंद करण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महाराष्ट्रासह देशभरातील अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर दाखल होतात. ५ व ६ डिसेंबर रोजी बाबासाहेबांच्या अनुयायांची होणारी गर्दी लक्षात घेता दादर रेल्वे स्थानकातील पूर्व व पश्चिम जोडणारा मध्य मोठा फलाट क्रमांक १२ वरील सर्व प्रवेशद्वार शहर हद्दीतून येणारा पूल रेल्वे अनुयायी व प्रवाशांच्या प्रवेशांसाठी बंद करण्यात आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी देशभरातील अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादनासाठी दाखल होतात. बाबासाहेबांच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर येतात. चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अनुयायांच्या स्वागतासाठी मुंबईतील विविध यंत्रणा सज्ज झाल्या असून रेल्वे पोलीसही सज्ज झाले आहेत. लोहमार्ग पोलीस आयुक्त एम राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलिसांनी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

एक दिशा मार्ग व वाहतुकीसाठी बंद रस्ते

  • स्वातंत्रवीर सावरकर मार्ग हा श्री सिध्दीविनायक मंदिर जंक्शनपासून हिंदूजा हॉस्पिटल पर्यंत वाहतुकीकरीता बंद राहिल. तथापी हिंदूजा हॉस्पिटल येथील स्थानिक नागरिक हे एस. बँक जंक्शन येथे डावे वळण घेवून पांडूरंग नाईक मार्गे राजाबडे चौक येथे जावू शकतील.

  • एस. के. बोले रोड उत्तर वाहिनी श्री. सिध्दीविनायक मंदिर जंक्शनपासून पोर्तुगिज चर्च जंक्शन पर्यंत एक दिशा मार्ग राहिल म्हणजेच सदर मार्गाच्या दक्षिण वाहिनीवरून पोतृगिज चर्च जंक्शन येथून श्री सिध्दीविनायक मंदिर जंक्शनकडे सर्व वाहनांना प्रवेश बंद राहिल.

  • रानडे रोड -ज्ञानेश्वर मंदिर रोड -जांभेकर महाराज रोड -केळुस्कर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर -एम. बी. राऊत मार्ग हा वाहतुकीकरीता बंद राहिल.

  • टी. एच. कटारीया मार्ग हा एल. जे. रोडच्या शोभा हॉटेल जंक्शन ते आसावरी जंक्शन पर्यंत वाहतुकीस बंद राहिल.

‘रेरा'चे अधिकारी, न्यायाधिकरण फ्लॅट वादाचा फैसला करु शकत नाहीत; उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्वाळा

राज्यभरात दीड कोटींची रोकड जप्त; १५ जणांवर गुन्हा दाखल; निवडणुकीत आचार संहितेचे उल्लंघन भोवणार

मुंबईकरांनो सावधान! अरबी समुद्र खवळणार, उंच लाटा उसळणार; आजपासून ३ दिवस मोठी भरती; किनारी जाणे टाळा - BMC चे आवाहन

शेतकऱ्यांसाठी केंद्राची मदत लवकरच; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण

'बोलो जुबां केसरी'...नववधूची स्टेजवरून शाहरूख खानकडे अनोखी डिमांड; नेटकरी घेतायेत मजा - बघा Video