मुंबई

दलाई लामा पुढील महिन्यात मुंबईत

डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुरात बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्यांनी मुंबईत धम्म दीक्षा परिषद आयोजित करण्याची योजना आखली होती

प्रतिनिधी

मुंबई : तिबेटी अध्यात्मिक गुरू दलाई लामा पुढील महिन्यात मुंबईत होणाऱ्या ‘धम्म दीक्षा’ या बौद्ध धर्मावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी येत आहेत. ही परिषद १५ डिसेंबर रोजी वरळी येथील स्पोर्ट‌्स स्टेडियम आणि १६ डिसेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्स येथे होणार आहे, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी सांगितले.

डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुरात बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्यांनी मुंबईत धम्म दीक्षा परिषद आयोजित करण्याची योजना आखली होती, परंतु त्याच वर्षी ६ डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले, असे आठवले म्हणाले. यंदा येथे संमेलन होत असल्याने आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण होईल, असे आठवले म्हणाले.

दलाई लामांव्यतिरिक्त श्रीलंकेचे पंतप्रधान दिनेश गुणवर्देना, थायलंडच्या पंतप्रधान स्रेथा थाविसिन, भूतान राजकुमारी केसांग वांगमो वांगचुक आणि कंबोडिया, व्हिएतनाम, थायलंड आणि इतर देशांतील बौद्ध नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत

अहिल्यानगरमध्ये तणाव; रास्ता रोको, लाठीमार

भारत-भूतान रेल्वेमार्गाने जोडणार; प्रकल्पाचा संयुक्त आराखडा जाहीर

पीडितांकडे न्यायालयाचे दुर्लक्ष नको; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू; केरळ भाजप प्रवक्त्याचे धक्कादायक विधान