मुंबई

दाऊदच्या गुंडाची सुटकेची याचिका फेटाळली; दहशतवाद निधी प्रकरणात सहभागाचा न्यायालयाचा दावा

दाऊद इब्राहिमच्या एका गुंडाला कथित दहशतवाद निधी प्रकरणात मुक्त करण्यास येथे एका न्यायालयाने नकार दिला.

Swapnil S

मुंबई : दाऊद इब्राहिमच्या एका गुंडाला कथित दहशतवाद निधी प्रकरणात मुक्त करण्यास येथे एका न्यायालयाने नकार दिला. गुन्ह्यात संबंधित गुन्हेगाराचा स्पष्ट सहभाग असल्याचे पुरेसे पुरावे उपलब्ध असल्याचे निरिक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

एटीएसने ऑगस्ट २०२२ मध्ये परवेज वैदला अटक केली होती. फरार गँगस्टर दाऊद इब्राहिम आणि त्याचा भाऊ अनीस यांनी गुन्ह्यातून मिळालेल्या पैशांचा वापर भारतात दहशतवादी कारवायांसाठी त्यांच्या साथीदारांच्या माध्यमातून केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.

परवेज वैदवर बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायदा (युएपीए) अंतर्गत दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचा आरोप ठेवण्यात आला. तसेच त्याच्यावर अंमली पदार्थ आणि मनोविकृत पदार्थ कायदा (एनडीपीएस) अंतर्गतही कारवाई केली. मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी त्याला जामीन मंजूर केला होता. त्यानंतर त्याने युएपीए प्रकरणांसाठी असलेल्या विशेष न्यायालयात मुक्ततेसाठी अर्ज दाखल केला.

विशेष न्यायाधीशांनी नमूद केले की, दाऊद इब्राहिम कासकर व त्याच्या साथीदारांच्या टोळीशी संबंधित बेकायदेशीर व्यवहारांमध्ये तो सामील असल्याचे दिसून येते.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता