मुंबई

निवडणूक सेवेतील पालिका कामगाराचा मृत्यू

अंधेरी पूर्वमध्ये निवडणूक सेवेत असलेल्या पालिकेच्या एका सफाई कामगाराचा मंगळवारी रात्री कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. त्याला आधी पालिकेच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात, तर त्यानंतर कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Swapnil S

मुंबई : अंधेरी पूर्वमध्ये निवडणूक सेवेत असलेल्या पालिकेच्या एका सफाई कामगाराचा मंगळवारी रात्री कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. त्याला आधी पालिकेच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात, तर त्यानंतर कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

अंधेरी पूर्वमध्ये निवडणूक सेवेत असणारा अनिल सातपुते हा कर्मचारी वांद्रे पश्चिम वॉर्डमध्ये कार्यरत होता. त्याला पालिकेच्या के/पूर्व अंधेरी विभागात कचरा उचलणाऱ्या लोडर गाडीवर निवडणुकीसाठी विशेष ड्युटी लागली होती. हा कर्मचारी ओल्ड नागरदास रोड मतदान केंद्र १९३ वर कार्यरत होता. मंगळवारी रात्री त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्याआधीच तो मृत झाला होता. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण श‌वविच्छेदनाचा रिपोर्ट आल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

"...तर महिलांना कोणी नोकरी देणार नाही"; मासिक पाळी रजेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Mumbai : पालिका शाळाही ‘गॅस’वर; मध्यान्ह भोजनात आता विद्यार्थ्यांना फळ वाटप, रुग्णालयांत सिलिंडर पुरवठा करण्यासाठी गॅस कंपनीला पत्र

घरगुती गॅस पुरवठ्यावर सरकारची नजर; जिल्हास्तरीय समित्या स्थापन, अफवांवर कारवाईचा इशारा

ST डेपोच्या विकासासाठी भाडेकराराला ९८ वर्षांपर्यंत वाढ; सरकारकडे प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी दाखल

'गॅस अपडेट'च्या नावाने ऑनलाइन फसवणूक; कल्याण-डोंबिवलीत दोन महिलांना ४ लाखांचा गंडा