मुंबई

पोस्टर्स बॅनर्स होर्डिंग्जमुळे मुंबईचे विद्रुपीकरण

दबावाला बळी न पडता पोस्टर्स, बॅनर्स हटवा - आयुक्त

प्रतिनिधी

मुंबई : कोणाच्या दबावाला बळी न पडता मुंबईचे विद्रुपीकरण करणारी बेकायदा पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज हटवा, असे सक्त आदेश मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी लायसन्स विभागाला दिले आहे. लायसन्स विभागाने राबवलेल्या विशेष मोहिमेत राजकीय, व्यवसायिक, धार्मिक बेकायदा पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज लावणाऱ्या तब्बल ७८२ जणांना न्यायालयात खेचले आहे. तर ३७३ जणांविरोधात विविध पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पालिकेच्या लायसन्स विभागाने गेल्या ८ महिन्यात राबवलेल्या विशेष मोहिमेत तब्बल १५ हजार ७१४ बेकायदा पोस्टर्स बॅनर्स होर्डिंग्ज हटवण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

मुंबईच्या विद्रुपीकरणास कारणीभूत ठरणाऱ्या अनधिकृत होर्डिंग्ज पोस्टर्स बॅनर्स झळकवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिका प्रशासनाला दिले आहेत. तसेच अनधिकृत होर्डिंग्ज पोस्टर्स बॅनर्स लावू नये, अशी सूचना मुंबईकरांना ही केली आहे. तरीही राजकीय पक्षांचे बॅनर्स पोस्टर्स व होर्डिंग्ज ठिकाणी ठिकाणी झळकतात. व्यवसायिक पोस्टर्स बॅनर्स अनधिकृतपणे लावले जात असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आल्यानंतर मुंबई महापालिका प्रशासनाने अनधिकृत होर्डिंग्ज पोस्टर्स बॅनर्स लावणाऱ्या विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.

३७३ जणांविरोधात गुन्हे दाखल

१ जानेवारी ते ऑगस्ट २०२३ या १० महिन्याच्या कालावधीत पालिकेने धडक मोहिम आखून तब्बल १५, ७१४ होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्सवर कारवाई केली. यामध्ये व्यावसायिक २,३३८ धार्मिक ८,८७९ तर राजकीय ४,४९७ अशी एकूण १५,७१४ होर्डिग्ज, बॅनर्स, पोस्टर्स हटवण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने ३७३ जणांविरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात राजकीय पक्ष, खाजगी संस्था आदींचा समावेश असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

१० महिन्यात झालेली कारवाई

राजकीय - ४,४९७

व्यावसायिक - २,३३८

धार्मिक - ८,८७९

एकूण - १५,७१४

कोणाचाही मुलाहीजा बाळगू नका

संपूर्ण मुंबईत जिथे-जिथे अवैध बॅनर, पोस्टर्स, जाहिरात फलक आदी आढळतील, ते सर्व काढण्याची मोहीम पुन्हा वेगाने राबवण्‍यात यावी. कोणाचाही मुलाहीजा न बाळगता, दबावाला बळी न पडता विनापरवाना बॅनर्स, पोस्‍टर्स, फलक सरसकट हटवा, असे सक्त निर्देश आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश