मुंबई

सोमय्यांनी आरोप करताच संजय राऊतांनी तडकाफडकी गाठले न्यायालय

प्रतिनिधी

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या पत्नी मेधा सोमय्यांनी (Medha Somaiya) शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. यावरून त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले असल्याची माहिती किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. यानंतर लगेच संजय राऊत यांनी शिवडी न्यायालयात हजेरी लावली. त्यांच्याविरोधात जारी करण्यात आलेला अजामीनपात्र वॉरंट रद्द करून घेतला. मानहानीचा सुनावणीला वारंवार गैरहजर राहिल्याने तक्रारदाराच्या विनंतीवरून हे एकारवाई करण्यात आली होती.

नेमकं प्रकरण काय?

मीरा भाईंदर महापालिका आणि राज्यात तब्बल १०० कोटींचा शौचालय घोटाळा केला असल्याचा दावा संजय राऊतांनी केला. किरीट सोमय्या हे युवा प्रतिष्ठान नावाची प्रतिष्ठान चालवत होते. त्यांनी खोटी बिले देऊन पैसे उकळले. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याची कारणे दाखवून हा घोटाळा केला. एकूण १०० कोटींचा हा घोटाळा युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रीमती सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबाने हा घोटाळा केल्याचा दावा त्यांनी केला होता.

यानंतर मेधा सोमय्या यांनी मुंबईतील शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. यावरील सुनावणीच्या वेळेस अनेकदा गैरहजर राहिल्याने दंडाधिकारी पी. आय. मोकाशी यांनी त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. या सुनावणीत न्यायालयाने मेधा सोमय्यांचा जबाब नोंदवून घेतला, त्यानंतर हा खटल्याची पुढची सुनावणी २४ जानेवारी रोजी निश्चित करण्यात आली आहे.

दक्षिण-मध्य मुंबईत शेवाळेंविरुद्ध देसाई

वेगमर्यादेमुळे हार्बरची कासवगती; लोकल विलंबाने धावत असल्याने प्रवाशांचे हाल

म्हस्केंच्या उमेदवारीमुळे महायुतीत सुंदोपसुंदी; नवी मुंबईतील ६४ माजी नगरसेवकांचे राजीनामे

विशाल पवार यांच्या हत्येचा तपास सुरू; गर्दुल्ल्यांच्या हल्ल्यात झाला मृत्यू

सीबीआय आमच्या नियंत्रणात नाही! सुप्रीम कोर्टात केंद्राचे धक्कादायक स्पष्टीकरण