Photo : X (Devendra Fadnavis)
मुंबई

आर्थिक विकासाला चालना, रोजगारनिर्मितीवर भर; 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमध्ये दाखल

‘महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेण्याचा वेग अधिक वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम २०२६ मध्ये सहभागी होण्यासाठी स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये रविवारी दाखल झाले.

Swapnil S

मुंबई : ‘महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेण्याचा वेग अधिक वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम २०२६ मध्ये सहभागी होण्यासाठी स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये रविवारी दाखल झाले. या परिषदेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, आर्थिक विकासाला चालना, रोजगारनिर्मिती यावर फोरममध्ये भर दिला जाणार आहे.

जागतिक व्यासपीठावर भारताचे विकास इंजिन म्हणून 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' अधिक बळकट करण्याचा निर्धार असून या नव्या ‘महा-ग्रोथ’ गाथेकडे जग अपेक्षेने पाहत आहे. महाराष्ट्राची १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल अधिक वेगवान करण्यासाठी ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम २०२६’ महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. गेल्यावर्षी १६ लाख कोटींचे गुंतवणूक करार महाराष्ट्राने केले होते. यावर्षी अधिक गुंतवणूक आणण्याचे उद्धिष्ट राज्य शासनाने ठेवले आहे.

दावोस येथे होणाऱ्या या परिषदेदरम्यान जागतिक उद्योगसमूह, गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांशी चर्चा करून महाराष्ट्रात थेट विदेशी गुंतवणूक, औद्योगिक प्रकल्प, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

आजचे राशिभविष्य, २५ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

निवडणुकांचे निकाल फिक्स करणारे 'ज्ञानेशगेट'

Anant Chaturdashi 2026 : 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!' अनंत चतुर्दशी निमित्त खास मराठी शुभेच्छा अन् HD कार्ड्स

लाल साडी अन् मोत्यांचा चोकर; 'लपंडाव' फेम कृतिकाचा पारंपरिक लूक चर्चेत

'४८ तासांत राजीनामा द्या, अन्यथा देशव्यापी आंदोलन'; CJP च्या अभिजीत दिपकेंचा ज्ञानेश कुमार यांना इशारा