मुंबई

Shradha Walker case : श्रद्धा वालकर प्रकरणावर फडणवीस यांची 'ही' प्रतिक्रिया

वृत्तसंस्था

श्रद्धाच्या पत्रावर देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे. “मलाही ते पत्र मिळाले आहे. मी ते पाहिले आहे. अतिशय गंभीर पत्र आहे. त्याच्यावर कारवाई का झाली नाही याची चौकशी करावी लागेल. मी कोणावरही आरोप करणार नाही. मात्र या प्रकारच्या पत्रांवर कारवाई न झाल्यास अशा घटना घडतात. त्यामुळे या पत्राची नक्कीच चौकशी केली जाईल. त्या पत्रावर कारवाई झाली असती तर कदाचित श्रद्धाचे प्राण वाचले असते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

श्रद्धा वालकर हत्या (Shradha Walker case) प्रकरणामध्ये रोज नवनवे खुलासे होत आहेत. बुधवारी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आफताबने श्रद्धाला यापूर्वीही मारहाण केली होती. तिने लिहिले २ वर्षापूर्वीचे पात्र पोलिसांच्या हाती लागले आहे. साधारण नोव्हेंबर २०२० मध्ये श्रद्धाने पालघर पोलिसांकडे आफताबविरोधात लेखी तक्रार केली होती. या तक्रारीमध्ये श्रद्धाने आफताब ब्लॅकमेल करायचा. शिवीगाळ करुन मला मारायचा, गळा दाबून हत्या करण्याचाही प्रयत्न केला, अशी तक्रार केली आहे. माझी हत्या करुन तुकडे करेल, अशी धमकीही आफताबने दिल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. वेळीच जर या गोष्टीकडे लक्ष दिले असते तर तिचा जीव वाचवता आला असता अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे.

पालघर जिल्ह्यातील तुळींज पोलीस ठाण्यात श्रद्धाने तक्रार केली होती. आफताबने श्रद्धाला खूप मारहाण केली होती. त्यानंतर श्रद्धा नालासोपारा येथील ओझोन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेली होती. या दरम्यानचा श्रद्धाचा एक फोटो समोर आला आहे. ज्यात तिच्या तोंडावर आफताबने मारहाण केलेल्याच्या जखमा दिसून येत आहेत. 

"अमेठी आणि रायबरेली दोन्ही माझं कुटूंब..." उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राहुल गांधींची भावनिक पोस्ट

संजय निरूपम यांचा शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाती घेतला भगवा

"जाहीर माफी मागा, अन्यथा..."; पॉर्न स्टार म्हटल्यामुळे दुखावलेल्या 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना इशारा

सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर झाले क्रॅश, Video सोशल मीडियावर व्हायरल

धक्कादायक! पत्नीनं दिलं गुंगीचं औषध, पतीनं केला बलात्कार...; मुंबईत नेमकं काय घडलं?