मुंबई

धारावी पुनर्विकासासाठी पहिल्या दिवशी ५० झोपड्यांचे सर्वेक्षण

धारावीतील कमला रमणनगर येथून अंतिम कागदपत्रांचा डेटा गोळा करण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण सुरू केले असून पहिल्या दिवशी ५० झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करण्यात आल्याचे धारावी पुनर्विकास प्रकल्प अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, साक्षी सावंत यांच्या घरापासून सर्वेक्षण सुरू झाले.

Swapnil S

मुंबई : धारावी पुनर्विकासाला गती देण्यासाठी झोपडपट्ट्यांतील घरांचे कागदपत्रे गोळा करण्यास सोमवार, १ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. धारावीतील कमला रमणनगर येथून अंतिम कागदपत्रांचा डेटा गोळा करण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण सुरू केले असून पहिल्या दिवशी ५० झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करण्यात आल्याचे धारावी पुनर्विकास प्रकल्प अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, साक्षी सावंत यांच्या घरापासून सर्वेक्षण सुरू झाले.

१८ मार्च रोजी प्रत्येक झोपडीला युनिक नंबर देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यानंतर लेन्सचे, लेसर मॅपिंग केले, ज्याला लायडर सर्वेक्षण असेदेखील म्हटले जाते. प्रत्येकी पाच सदस्यांच्या, पाच पथकांनी सदनिकाधारकांच्या निवासस्थानांना किंवा व्यावसायिक आस्थापनांना भेट दिली. येत्या काही दिवसांत या प्रक्रियेला गती देण्यासाठी तैनात केलेल्या पथकांची संख्या वाढवली जाईल, असे धारावी पुनर्विकास प्रकल्प अधिकाऱ्याने सांगितले.

सर्वात जुनी आणि नवीनतम वीज बिले, मतदार ओळखपत्र, मतदारयादीची प्रत, गुमास्ता परवाना आणि बीएमसीने जारी केलेला हॉटेल परवाना यासारख्या कागदपत्रांच्या स्व:साक्षांकित छायाप्रती गोळा केल्या. मूळ कागदपत्रे स्कॅन करून जागेवर सदनिकाधारकांना कागदपत्रे परत करण्यात आली. याशिवाय सदनिकाधारकांच्या छायाचित्रांसह, त्यांच्या कौटुंबिक छायाचित्रांचेही संकलन करण्यात आले. दरम्यान, सर्वेक्षण प्रक्रियेद्वारे गोळा केलेला डेटा, सर्वेक्षणाच्या शेवटी राज्य सरकारला सादर केला जाईल, ज्याद्वारे राज्य शासन, झोपडीधारकाची पात्रता निश्चित करेल.

असे होतेय सर्वेक्षण!

सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणात, सदनिकाधारकांना कुटुंबाचा आकार काय आहे? प्रत्येक सदस्याची शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे? किती कमावते सदस्य कुटुंबात आहेत? एकूण कौटुंबिक उत्पन्न किती? ते सध्याच्या सदनिकेत किती काळ राहतात? त्यांची मातृभाषा कोणती? त्यांचे मूळ गाव कोणते आहे? त्यांना धारावीत नोकरी आहे की धारावीबाहेर? ते नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात का? किंवा खासगी वाहनाने कामाच्या ठिकाणी जातात? इत्यादी प्रश्न विचारण्यात आले.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास