मुंबई

१४० कोटी भारतीयांचा अपेक्षाभंग; ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा अजिंक्य

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताचा डाव ५० षटकांत २३० धावांत संपुष्टात आला

नवशक्ती Web Desk

अहमदाबाद : संपूर्ण स्पर्धेत वर्चस्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत दारुण पराभव पत्करला. सलग १० सामने जिंकूनही अंतिम लढतीतील पराभवाने भारतीय संघाचे मूसळ केरात गेले. ट्रेव्हिस हेडच्या १३७ धावांच्या शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारताला ६ गडी राखून धूळ चारत तब्बल सहाव्यांदा विश्वचषक उंचावला. त्यामुळे १४० कोटी भारतीयांचा अपेक्षाभंग झाला.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताचा डाव ५० षटकांत २३० धावांत संपुष्टात आला. मग ऑस्ट्रेलियाने ४३ षटकांत हे लक्ष्य गाठले. त्यामुळे १९८३ व २०११नंतर तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्यात भारताला अपयश आले. पराभवानंतर भारतीय खेळाडू तसेच मैदानातील पाठिराख्यांना अश्रूंना आवर घालणे कठीण गेले.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस