मुंबई

पालिकेचा आपत्ती विभागच संकटात; नियंत्रण कक्षातील ४६ हॉटलाईन ठप्प

कोरोना काळात रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही, कुठल्या रुग्णालयात कोविडची टेस्ट अशा विविध प्रश्नांची उत्तरे देत संबंधित व्यक्तीला वेळीच मदत पोहोचवण्याची जबाबदारी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने पार पडली आणि अनेकांना जीवदान मिळाले.

Swapnil S

गिरीश चित्रे/मुंबई

झाडांची फांदी कोसळली, इमारत कोसळली, आग लागली, पाणी तुंबले तर मदतीसाठी मुंबई पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाचा फोन खणखणतो. मात्र पालिकेच्या या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षातील ५८ पैकी ४६ हॉटलाईन ठप्प असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपत्ती विभागच आपत्कालीन परिस्थितीत अडकल्यास, पावसाळ्यात मुंबईकरांना कोण मदत उपलब्ध करून देणार, अशी भीती पालिका प्रशासनाला सतावत आहे. दरम्यान, ‘१९१६’ या क्रमांकावरील बंद असलेली ‘हॉटलाइन’ फोन सेवा तातडीने सुरू करावी, यासाठी पालिका प्रशासनाने ही सेवा देणाऱ्या ‘एमटीएनएल’ला पत्र दिल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

कोरोना काळात रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही, कुठल्या रुग्णालयात कोविडची टेस्ट अशा विविध प्रश्नांची उत्तरे देत संबंधित व्यक्तीला वेळीच मदत पोहोचवण्याची जबाबदारी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने पार पडली आणि अनेकांना जीवदान मिळाले. कोविड काळात मदत उपलब्ध करून देणाऱ्या पालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्ष २४ बाय ७ असा दिवसरात्र सुरूच असतो. आपत्ती विभागात ६० हून अधिक अधिकार व कर्मचारी कार्यरत आहेत. अमुकतमुक ठिकाणी पाणी भरले, मिठी नदीतील पाणी ओव्हरफ्लो झाले, इमारतीचा भाग कोसळला, अशावेळी मदतीसाठी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाचा फोन खणखणतो. दीड महिन्यांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. पावसाळ्यात आपत्ती ओढावल्यास पालिकेच्या आपत्कालीन कक्षास मदतीसाठी फोन येतो आणि संबंधित यंत्रणेच्या माध्यमातून मदत उपलब्ध करून देण्यात येते.

मुंबईत कोणत्याही आपत्कालीन स्थितीमध्ये धावून येणाऱ्या महापालिकेच्या महत्त्वाच्या डिझास्टर मॅनेजमेंट विभागातील ५८ पैकी तब्बल ४६ हॉटलाइन नंबर बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोणतीही आपत्कालीन स्थिती निर्माण झाली तर संपर्कव्यवस्था ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात आपत्ती विभागावर आपत्ती ओढवू नये, यासाठी तातडीने हॉटलाईन सेवा सुरू करण्यात यावी, यासाठी मुंबई महानगर टेलिफोन निगम लिमिटेड कंपनीला पत्र दिल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुख्यमंत्रीपदाचा फैसला आज; महायुतीचे नेते व केंद्रीय संसदीय मंडळ घेणार निर्णय

महायुतीत मंत्रिपदासाठी २१-१२-१० चा फॉर्म्युला

आजपासून सुरू होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; अदानी, मणिपूरवर चर्चा करा! सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांची मागणी

यशस्वी, विराटचा शतकी तडाखा; भारताचा दुसरा डाव ४८७ धावांवर घोषित; ऑस्ट्रेलियाची ३ बाद १२ अशी अवस्था

यूपीतील हिंसाचारात तिघांचा मृत्यू; २० पोलिसांसह अनेक जण जखमी