मुंबई

... तर कामगारांवर शिस्तभंगाची कारवाई; BMC चा कामचुकार कामगारांना इशारा

कामाची वेळ संपण्याआधीच घरी जाण्याची घाई असलेले कर्मचारी फेशियल बायोमेट्रिक मशीन समोर गर्दी करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

Swapnil S

मुंबई : कामाची वेळ संपण्याआधीच घरी जाण्याची घाई असलेले कर्मचारी फेशियल बायोमेट्रिक मशीन समोर गर्दी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. हा प्रकार म्हणजे कामात कामचुकारपणा आहे. वेळेआधी घरी जाण्यासाठी फेशियल बायोमेट्रिक मशीन समोर गर्दी करणे कर्मचाऱ्यांना आता भारी पडणार आहे. वेळेआधी कार्यालय सोडण फेशियल बायोमेट्रिक मशीनवर नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने कामचुकार कामगारांना दिला आहे.

मुंबई महापालिका मुख्यालयात एक लाखाहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांना कामाची शिस्त व वेळेचे बंधन पाळणे यासाठी

स्वाक्षरी घेऊन हजेरी लावण्याची पद्धत अंमलात आणली होती. मात्र याचा काही कामगार दुरुपयोग करत कामावर बिनधास्त दांड्या मारत व बाहेर कुठेही मजा करीत असल्याचे निदर्शनास आले. ही गंभीर बाब लक्षात आल्याने मुंबई महापालिकेत २०१८ पासून मस्टरवरील हजेरी पद्धत बंद करत बायोमेट्रिक हजेरी पद्धत आणली. मात्र त्यातही काही महाभाग कामगारांनी बोटाचा बनावट ठसा बनवला आणि कामचोरी करून बोगस हजेरी लावण्याची किमया साधली.

ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने पालिकेने या कामचोरीला चाप लावण्यासाठी बायोमेट्रिक थंप सिस्टीम मोडीत काढली. आता 'फेशियल बायोमेट्रिक मशीन ' द्वारे कामगारांनी हजेरी लावण्याची कार्यपद्धती १ जानेवारी २०२५ पासून सुरू केली आहे. सध्या महापालिका मुख्यालयात आणि पालिकेच्या आणखीन काही इतर कार्यालयाच्या ठिकाणी या मशिन लावण्यात आल्या आहेत. मात्र या पद्धतीत कामगार वेळेआधी येऊन हजेरी लावत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मंगळवारी पालिकेच्या सर्व विभागांत उद्घोषणा करत शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत