दिशा सॅलियन मृत्यूप्रकरणी सुनावणी पूर्ण, निर्णय राखून ठेवला 
मुंबई

दिशा सॅलियन मृत्यूप्रकरणी सुनावणी पूर्ण, निर्णय राखून ठेवला

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सॅलियन हिच्या मृत्यूप्रकरणी तिचे वडील सतीश सॅलियन यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात पूर्ण झाली असून न्यायालयाने यावर आपला निर्णय राखून ठेवला आहे. जून २०२० मध्ये मुंबईतील एका इमारतीवरून पडून दिशाचा मृत्यू झाला होता.

उर्वी महाजनी

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सॅलियन हिच्या मृत्यूप्रकरणी तिचे वडील सतीश सॅलियन यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात पूर्ण झाली असून न्यायालयाने यावर आपला निर्णय राखून ठेवला आहे. जून २०२० मध्ये मुंबईतील एका इमारतीवरून पडून दिशाचा मृत्यू झाला होता.

दिशाने आत्महत्या केली नसून तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिचे वडील सतीश सॅलियन यांनी केला आहे. पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही, असा दावा करत त्यांनी या प्रकरणाची निपक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. दुसरीकडे, मुंबई पोलिसांच्या प्राथमिक तपासात दिशाचा मृत्यू आत्महत्येमुळेच झाल्याचे राज्य सरकारने न्यायालयाला सांगितले.

शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती आर. आर. भोसले यांच्या खंडपीठाने दिशाच्या मृत्यूशी संबंधित विविध परिस्थितींची तपासणी केली तसेच घटनेच्या पंचनाम्यातील विविध मुद्द्यांवर न्यायालयाने राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागितले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

नेपाळमध्ये पुन्हा महापुराची भीती! मृतांचा आकडा ५४७ वर; ३२० भारतीय बेपत्ता; ४०० जण तिबेटच्या सीमेवर अडकले

Nepal Floods : राज्यातील ६० पर्यटकांशी अद्याप संपर्क नाही; २९० जण सुरक्षित, १०५ जण भारताच्या दिशेने रवाना

Maratha Reservation : मागण्या न मानल्यास 'वर्षा'समोर आंदोलन; मनोज जरांगेंचा इशारा, आजपासून उपोषण

Jalna : ब्राह्मण समाजातर्फेही आजपासून उपोषण

Mumbai : दूध १०२ रुपये लिटर; घाऊक दरात ९ रुपये वाढ; १ सप्टेंबरपासून सुटे दूध महागणार