मुंबई

मतदानासाठी खासगी कार्यालयांनी सुटी न दिल्यास कारवाई

मुंबई उपनगर जिल्हा कार्यक्षेत्रात मतदार असलेले मात्र ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्या सर्व चाकरमान्यांना मतदान करता यावे यासाठी भरपगारी सुटी अथवा दोन तासांची सवलत देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Swapnil S

मुंबई : मतदानाकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यातील उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुटी अथवा सवलत न दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबधित आस्थापनांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ करिता मुंबई उपनगर जिल्ह्यात समाविष्ट लोकसभा मतदारसंघात २० मे रोजी मतदान होणार आहे. मुंबई उपनगर जिल्हा कार्यक्षेत्रात मतदार असलेले मात्र ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्या सर्व चाकरमान्यांना मतदान करता यावे यासाठी भरपगारी सुटी अथवा दोन तासांची सवलत देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या आस्थापनांना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल अशा आस्थापनांनी मतदारांना दोन तासांची सवलत द्यावी, मात्र त्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक राहील.

UPI व्यवहारांवरील MDR शुल्काला तूर्तास ब्रेक! सणासुदीत NPCI चा मोठा निर्णय, आता कधीपासून मोजावे लागणार पैसे?

Punjab : फेसबुक लाइव्ह सुरू असतानाच गोळीबार; ड्रग्सविरोधी कार्यकर्ते परविंदर झोटा यांची हत्या, Video

CJP Protest : जंतर-मंतरवर प्रवेश करताच दिल्ली पोलिसांची कारवाई; सौरव दास, आशुतोष रांकांसह अजिंक्य शिंदे ताब्यात

Mumbai : माटुंगा रेल्वेच्या २२ एकर जागेवर धारावी पुनर्वसन घरांचे भूमिपूजन

Mumbai : कारवाईआधी राज्य सरकारशी चर्चा करा! झोपड्यांबाबत खासदारांची विभागीय बैठक; रेल्वेला सूचना