मुंबई

प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेचा डोंबिवली स्थानकावर आज आणि उद्या रात्री पॉवर ब्लॉक

ब्लॉक कालावधीत दिवा आणि कल्याणदरम्यान रेल्वे वाहतूक प्रभावित राहील, असे रेल्वेने म्हटले आहे. याआधी ११ ते १४ ऑक्टोबरदरम्यान कर्जत यार्डच्या पुनर्रचनेसंदर्भातील प्री नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी चार दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला होता.

Krantee V. Kale

डोंबिवली स्थानकावर १२ मीटर रुंद फूटओव्हर ब्रिज (एफओबी) साठी गर्डर बसवण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेने दोन दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक (नाईट ब्लॉक) जाहीर केला आहे.

सेंट्रल रेल्वेच्या अधिकृत निवेदनानुसार, ब्लॉक १५ आणि १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १२.२० ते पहाटे ३ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. या कालावधीत दिवा आणि कल्याणदरम्यान रेल्वे वाहतूक प्रभावित राहील, असे रेल्वेने म्हटले आहे.

अप आणि डाऊन जलद मार्ग तसेच ५व्या आणि ६व्या मार्गावर हा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. याआधी ११ ते १४ ऑक्टोबरदरम्यान कर्जत यार्डच्या पुनर्रचनेसंदर्भातील प्री नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी चार दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला होता.

१५ आणि १६ ऑक्टोबरच्या ब्लॉकदरम्यानचा बदल

डाउन मेल/एक्सप्रेस गाड्या :
गाडी क्रमांक ११०४१, २२८६५ आणि २२५३८ या दिवा ते कल्याणदरम्यान डाउन फास्ट लाईनवर चालतील.

अप मेल/एक्सप्रेस गाड्या :
गाडी क्रमांक ११०२० आणि १८५१९ या कल्याण–पनवेल मार्गे वळवण्यात येतील आणि कल्याणमध्ये उतरणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल आणि ठाणे येथे थांबा देण्यात येईल.

अप मेल/एक्सप्रेस गाड्यांचे नियमन :

  • गाडी क्रमांक २२१०४ कल्याण येथे २५ मिनिटे थांबवण्यात येईल.

  • गाडी क्रमांक १२१०२ कल्याण येथे २० मिनिटे थांबवण्यात येईल.

  • गाडी क्रमांक १८०३० खडवली येथे १० मिनिटे थांबवण्यात येईल.

दिवाळी आणि छठपूजेच्या निमित्ताने सेंट्रल रेल्वे एकूण सुमारे १,४६६ गाड्या चालवणार आहे.

राजकीय ताणतणावाचे घातक परिणाम

ऐतिहासिक साफसफाई मोहीम

आजचे राशिभविष्य, ३० जानेवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

हिवाळ्यात खा पौष्टिक नाचणीचे पराठे; जाणून घ्या सोपी रेसिपी

ऐन तारुण्यात केस पांढरे झाले? आवळ्यापासून घरीच बनवा नॅचरल हेअर डाय