मुंबई

बेस्टच्या दरात दुप्पट वाढ? ५ रुपयांचे तिकिट १०ला; ६ रुपयांऐवजी १२ रुपये मोजावे लागणार

मुंबईकरांची सेंकड लाइफलाइन असलेल्या बेस्टच्या एसी आणि नॉन एसी बसच्या भाडेदरात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासन घेण्याच्या तयारीत आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईकरांची सेंकड लाइफलाइन असलेल्या बेस्टच्या एसी आणि नॉन एसी बसच्या भाडेदरात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासन घेण्याच्या तयारीत आहे. शासनाने मंजुरी दिल्यानंतर या प्रस्तावाची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती बेस्टच्या अधिकाऱ्यांनी दिली.

गेल्या काही दिवसांत बेस्ट प्रशासन अपघातामुळे सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. यासह अनेक मुद्द्यांवर बेस्टचे नवे महाव्यवस्थापक श्रीनिवास यांनी गेल्या आठवड्यात आढावा घेतला. यावेळी बस ऑपरेशन तसेच प्रलंबित मागण्यांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर या बैठकीदरम्यान बेस्टच्या तिकिटदरात वाढ करून दाम दुप्पट करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यामुळे भाडेवाढ झाल्यास यानुसार सामान्य बसप्रवासासाठी प्रवाशांना ५ रुपयांऐवजी १० रुपये मोजावे लागणार आहे. तर एसी बससाठी प्रवाशांना ६ रुपयांऐवजी १२ रुपये शुल्क भरावे लागणार आहेत.

CSMT वर शिवाजी महाराजांचा पुतळा होणारच! मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

IndiGo च्या विमान उड्डाणात १० टक्के कपात; गैरसोय टाळण्यासाठी केंद्राचा निर्णय

आता भारतीय तांदळावर दुप्पट टॅरिफ लावणार? डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत

मतचोरी हे सर्वात मोठे देशद्रोही कृत्य! राहुल गांधी यांचा सरकारवर हल्लाबोल

नागपुरात ‘कॅश बॉम्ब’; अंबादास दानवेंच्या व्हिडीओमुळे खळबळ