मुंबई

दसरा, दिवाळीत मध्य रेल्वेची विशेष सेवा अतिरिक्त गर्दीवर नियंत्रणासाठी सेवा कालावधीत वाढ

गाड्यांच्या वेळेत, संरचना आणि थांब्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही

नवशक्ती Web Desk

मुंबई : दसरा, दिवाळी छठ सणासुदीच्या काळात अतिरिक्त होणारी गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दसरा दिवाळी छठ सणासुदीच्या काळात गावी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. या कालावधीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, गाड्यांच्या वेळेत, संरचना आणि थांब्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

विशेष गाड्यांच्या कालावधीत अशी केली वाढ

-०७६३८ साईनगर शिर्डी-तिरुपती साप्ताहिक विशेष २५ सप्टेंबर चालवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता हा कालावधी १६ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे.

-०७६३७ तिरुपती – साईनगर शिर्डी साप्ताहिक स्पेशल २४ सप्टेंबरपर्यंत चालवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या कालावधीत वाढ केली असून १५ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

-०७१९६ दादर-काझीपेठ साप्ताहिक विशेषांक २८ सप्टेंबरपर्यंत चालवण्यात येणार होती. आता कालावधीत वाढ केली असून ५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत चालवण्यात येणार आहे.

- ०७१९५ काझीपेठ- दादर साप्ताहिक स्पेशल २७ सप्टेंबरपर्यंत चालवण्यात येणार होती. आता ४ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आले आहे.

- ०७१९८ दादर- काझीपेठ साप्ताहिक विशेष ८ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबरपर्यंत चालवण्यात येणार आहे.

-०७१९७ काझीपेठ-दादर साप्ताहिक स्पेशल ७ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबरपर्यंत चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

आरक्षण केंद्र सुरू!

आरक्षण: विशेष ट्रेन क्रमांक ०७६३८,०७१९६ आणि ०७१९८ च्या विस्तारित प्रवासासाठी विशेष शुल्कासह बुकिंग उद्या शनिवार ३० सप्टेंबरपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in संकेतस्थळावर सुरू होईल.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा!

या विशेष ट्रेनच्या वेळा आणि थांब्यांबद्दल तपशीलवार माहितीसाठी, कृपया www.enquiry ला भेट द्या. Indianrail.gov.in वर तपासा किंवा NTES ॲप डाउनलोड करा.

Ram Sutar Passes Away : भारतीय शिल्पकलेतील युगाचा अंत; ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे शिल्पकार राम सुतार यांचे निधन

मीरा भाईंंदरच्या अंतिम मतदार यादीतही प्रचंड घोळ; अनेक मतदारांची नावे ठाणे महापालिकेत तर १६०० मतदारांची नावे घरापासून लांब

भारत आणि ओमान आज मस्कतमध्ये मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करणार

ठाण्यात भाजप-शिवसेनेचं ठरलं! शिंदे सेना भाजपला जागा वाटपाचा नवा प्रस्ताव देणार

BMC Election : आर्थिक राजधानीच्या नागरी प्रवासाची १५४ वर्षे!